जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / पुणे : मुलाने मुलगी पळवून नेल्याचा धक्का! आईवडिलांसह कुटुंबातील 7 जणांची भीमा नदीत उडी अन्..

पुणे : मुलाने मुलगी पळवून नेल्याचा धक्का! आईवडिलांसह कुटुंबातील 7 जणांची भीमा नदीत उडी अन्..

पुणे : मुलाने मुलगी पळवून नेल्याचा धक्का!

पुणे : मुलाने मुलगी पळवून नेल्याचा धक्का!

Pune Crime News: मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 24 जानेवारी : प्रेमविवाहास कुटुंबियांचा विरोध असल्यास अनेक तरुण-तरुणी पलायन करुन संसार थाटत असल्याच्या घटना वाढत आहेत. यातील बऱ्याच प्रकरणात कुटुंब त्यांना स्वीकारते तर काहीजण कायमचं संबंध संपवतात. मात्र, दौड येथील घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या  (Daund) रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह 3 मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये ही घडना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर दौंड शहरात खळबळ उडाली आहे. मयताच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत न आणल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यावेळी घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वाचा - पुण्यात आणखी एक प्रकाशन सोहळा वादात; गुजरातमधील वादग्रस्त एन्काऊंटर पुस्तकाचा विषय मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे आहेत. हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर  वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि  22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

भीमा नदीत एकापाठोपाठ सापडले 7 मृतदेह दरम्यान भीमा नदीत एकापाठोपाठ एक असे 7 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या मागचं कारण समोर येईलपर्यंत परिसरात दहशत पसरली होती. हे मृतदेह कुणाचे आहेत याबाबत पोलीस तपास करत होते. या सर्वांची हत्या झाली की घातपात याबाबत तपास केला गेला. मात्र, अखेर सत्य समोर आल्याने आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात