अश्लील VIDEO बनवून महिलेने प्राध्यापकाकडे मागितले 10 लाख; प्रकरण मीडियात नेण्याची दिली धमकी

अश्लील VIDEO बनवून महिलेने प्राध्यापकाकडे मागितले 10 लाख; प्रकरण मीडियात नेण्याची दिली धमकी

अश्लील व्हिडिओच्या (Obscene Videos) आधारे एका प्राध्यापकाला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आरोपी महिलेनं आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून एका प्राध्यापकाला लुटलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 20 फेब्रुवारी: अश्लील व्हिडीओच्या (Obscene Videos) आधारे एका प्राध्यापकाला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आरोपी महिलेनं आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून एका प्राध्यापकाला लुटलं आहे. तसेच अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर आणि माध्यमांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देवून 10 लाख रुपयांची खंडणी देखील मागितली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाला अज्ञात नंबरवरून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर दोघांचं बोलणं झालं. अशाच प्रकारच्या गप्पा त्यांच्यात वारंवार होऊ लागल्या. आरोपी महिला नेहमी प्राध्यापकाला फोन करायची आहे, प्राध्यापकही तिच्याशी बोलायचे. त्यानंतर एकेदिवशी संबंधित महिलेनं मुलगा आजारी असल्याचा बहाणा बनवून प्राध्यापकाला घरी बोलावून घेतलं. प्राध्यापक ज्यावेळी आरोपी महिलेच्या घरी गेले, त्यावेळी तिथे अगोदरच दोन व्यक्ती होते.

त्यानंतर या महिलेनं आपल्या दोन पुरूष साथीदारांच्या मदतीने प्राध्यापकाला पकडलं आणि बंधक बनवलं. एवढंच नव्हे तर आरोपींनी प्राध्यापकाचे कपडे काढून त्याचा अश्लील व्हिडिओही बनवला आहे. शिवाय हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देवून आरोपींनी दहा लाख रुपयांची मागणी देखील केली आहे. प्राध्यापकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पत्रकार असल्याचा बनाव करत, व्हिडीओ मीडियामध्ये चालवण्याची धमकीही दिली आहे.

(हे वाचा - मनोरंजन विश्वात आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका TV अभिनेत्याने संपवलं जीवन)

पीडित प्राध्यापकाने आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका  करून घेतली. त्यानंतर त्यांने पोलिसांत जावून घडलेली सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी संबंधित बनावट पत्रकारांना वृंदावन चिरैया बाग परिसरातून अटक केली आहे.

Published by: News18 Desk
First published: February 20, 2021, 1:20 PM IST

ताज्या बातम्या