Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! अकोल्यामध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सापळा रचत चौघांना अटक

धक्कादायक! अकोल्यामध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सापळा रचत चौघांना अटक

उरळ पोलीस ठाण्याच्या (Ural Police Station) हद्दीत एक कुंटणखाना चालवला जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. एक महिला बाहेरच्या जिल्ह्यातील मुली बोलवत होती आणि घरात देहविक्रीचा व्यवसाय करत होती.

  • Published by:  News18 Desk

अकोला, 27 मे : वेश्या व्यवसायासंबंधी (Prostitution Racket) एक धक्कदायक बातमी अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. पोलिसांनी अकोला येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई केली. यावेळी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

घरात देहविक्रीचा व्यवसाय

पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाई करत चार जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. उरळ पोलीस ठाण्याच्या (Ural Police Station) हद्दीत एक कुंटणखाना चालवला जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. एक महिला बाहेरच्या जिल्ह्यातील मुली बोलवत होती आणि घरात देहविक्रीचा व्यवसाय करत होती. या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात करण्यात आली.

मोबाईल फोनसह मुद्देमाल जप्त

निमकर्दा इथे हा कुंटणखाना चालवला जात होता. या कुंटणखान्यावर पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या पथकाने सापळा रचून छापेमारी केली. या कारवाईत चौघांना रंथेहाथ पकडण्यात आले. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कुंटणखाना चालवला जात होता. त्यामुळे उरळ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणाहून काही मोबाईल फोन आणि मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून देहविक्रीसाठी मुली आणल्या जात होत्या, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस आणखी कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा - Mumbai : प्रेयसीसोबत चॅटिंग करणं पडलं महागात; पोलिसांच्या जाळ्यात अडकला मोबाईल चोर

काही दिवसांपूर्वी नागपूर येथेही पर्दाफाश

काही दिवसांपूर्वी नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात हा प्रकार उघडकीस आला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (Crime Branch Social Security Team) या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. विशेष म्हणजे, चक्क एक पेन्शनर महिला हे सेक्स रॅकेट चालवायची, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. (Pensioner Woman Prostitution Racket Nagpur) रेखा उर्फ अनिता पाचपोर असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचे नाव होतं. रेखा उर्फ अनिता पाचपोर ही महिला सेक्स रॅकेट चालवत होती. नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरात हा धक्कादायक प्रकार सुरू होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली.

First published:

Tags: Crime news, Police, Sex racket