Home /News /crime /

Mumbai : प्रेयसीसोबत चॅटिंग करणं पडलं महागात; पोलिसांच्या जाळ्यात अडकला मोबाईल चोर

Mumbai : प्रेयसीसोबत चॅटिंग करणं पडलं महागात; पोलिसांच्या जाळ्यात अडकला मोबाईल चोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सध्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ (Theft Incidents Increasing) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस या चोरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातच आता एका मोबाईल चोराला (Mobile Theft) चोरीच्या मोबाईलवरुन आपल्या प्रेयसीलाच मेसेज केल्याचे महागात पडले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 27 मे : सध्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ (Theft Incidents Increasing) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस या चोरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातच आता एका मोबाईल चोराला (Mobile Theft) चोरीच्या मोबाईलवरुन आपल्या प्रेयसीलाच मेसेज केल्याचे महागात पडले आहे. नेमकं काय घडलं - मागच्या महिन्यात पारुल बडगुजर नावाच्या महिला म्हाडा कॉलनी (Mhada Colony) मुलूंड पूर्व येथील बस स्थानकावर त्या बसची वाट पाहात होत्या. त्याच वेळी त्यांच्यासोबत एक घटना घडली. भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या दोघांनी पारूल यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. (Mobile Theft at Mulund East Bus Stop) यानंतर लगेचच तेथून पळ काढला. यानंतर याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) गुन्हा दाखल झाला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव पवार, गणेश सानप आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्यात पोलिसांना आरोपीचे छायाचित्र मिळाले. तर दुसरीकडे चोरीच्या या मोबाईलमध्ये आरोपीने सिमकार्ड टाकले आणि तो आपल्या प्रेयसीसोबत चॅटिंग करू लागला. अशी आरोपींची नावे - पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपीचे लोकेशन ट्रॅक करण्यात मदत झाली. पोलिसांनी लगेचच भिवंडी येथे जाऊन आरोपींना अटक केली. आस्वाद इमरान अहमद शेख (वय 19) आणि अरबाज लतीफ अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अरबाजने आस्वाद याला मोबाईल चोरी करताना मदत केली होती. गेल्या महिन्यात ही चोरीची घटना घडली होती. त्यानंतर आता आरोपींना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाने चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह; अखेर...
  आरोपीकडून 'या' गोष्टी हस्तगत -
  अटक करण्यात आलेल्या चोरांकडून चोरीला गेलेला मोबाईल तसेच चोरी करताना वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींनी असे आणखी किती चोरीचे गुन्हे केले आहेत, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Mobile, Police, Theft

  पुढील बातम्या