जाहिरात
मराठी बातम्या / Viral / माणुसकीचं दर्शन! रुग्णालयाबाहेर वेदनेनं तडफडत होती गर्भवती, जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टरचा VIDEO VIRAL

माणुसकीचं दर्शन! रुग्णालयाबाहेर वेदनेनं तडफडत होती गर्भवती, जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टरचा VIDEO VIRAL

माणुसकीचं दर्शन! रुग्णालयाबाहेर वेदनेनं तडफडत होती गर्भवती, जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टरचा VIDEO VIRAL

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) डेप्युटी सिव्हिल सर्जन डॉ. रमेश पांचाल यांनी मानवतेची ओळख करुन दिली आहे. रुग्णालयाच्या मुख्य गेटवर स्ट्रेचर न मिळाल्यानं वेदनेनं तडफडत असलेल्या महिलेला उचलून घेत त्यांनी आपात्कालीन (Emergency) वार्डात पोहोचवलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) कठीण काळात डॉक्टर (Doctor) आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. या काळात रुग्णांच्या मदतीला धावून येणारे डॉक्टर अनेकांचे जीव वाचवत आहेत. अशात आता अशाच आणखी एका डॉक्टरचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे. हरियाणातील जींद जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) डेप्युटी सिव्हिल सर्जन डॉ. रमेश पांचाल यांनी मानवतेची ओळख करुन दिली आहे. रुग्णालयाच्या मुख्य गेटवर स्ट्रेचर न मिळाल्यानं वेदनेनं तडफडत असलेल्या महिलेला उचलून घेत त्यांनी आपात्कालीन (Emergency) वार्डात पोहोचवलं. डॉक्टरांनी महिलेला उचलेलं पाहाताच कर्माचारी स्ट्रेचर घेऊन आले, मात्र तोपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला. सोनिया (वय 38) ही आठ महिन्यांची गर्भवती होती. तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोनिया या उत्तर प्रदेशच्या बांदा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सोनिया आपला पती रामशाहीसोबत खरकरामजी गावातील एका विट भट्टीमध्ये काम करायची. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. महिलेच्या मृत्यूनंतर तिची कोरोना चाचणी केली असून अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जाहिरात

काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी ट्विट करत डॉक्टरांच्या या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, की जींदच्या रुग्णालयात स्ट्रेचर मिळाली नाही आणि महिलेची स्थिती गंभीर दिसली. यानंतर महिला रुग्णाला आपल्या दोन्ही हातांनी उचलत डेप्यूटी सिव्हिल सर्जन डॉक्टर रमेश पांचाल धावले, salute sir…कोण म्हणतं की माणुसकी संपली आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे एसएमओ डॉ. गोपाल गोयल यांनी सांगितले की, महिलेमध्ये अशक्तपणा होता. मागची चौकशी केल्यानंतर समजलं, की रक्ताअभावी महिला अलीकडेच रुग्णालयात दाखल झाली होती, मात्र पूर्ण उपचार न घेताच तिला घरी माघारी नेण्यात आले. अशात सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं महिलेला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आलं. इथेच उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयात 110 हून अधिक कोरोना रुग्ण दाखल असल्यानं स्ट्रेचर शिल्लक नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. महिलेच्या पतीनं सांगितलं, की त्याच्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयता पोहोचल्यानंतर तिथे स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं. स्ट्रेचरचा शोध सुरू असतानाच डॉ. रमेश पांचाल आले आमि त्यांनी महिलेला उचलून घेत इमरजन्सी वार्डात पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात