मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या

चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिघा परिसरात या नग्न चोराची दहशत वाढत चालली होती. तो अंगावरील सगळे कपडे काढून फिरायचा.

  • Published by:  Chetan Patil
अमित राय, मुंबई, 23 सप्टेंबर : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा शहंशाह चित्रपट जवळपास सर्वांनी पाहिला आहे. या चित्रपटात 'अंधेरी रातो में, सुनसान राहों पर...' असं एक गाणं आहे. खरंतर चित्रपटातला नायक शहंशाह हा रात्रीच्या वेळी शहरात गल्लोगल्लीत फिरुन गुन्हेगारांना धडा शिकवायचा. खरंतर तो चित्रपट आहे. पण नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीच्या वेळी गल्यांमध्ये एक नग्न व्यक्ती रस्त्यांवर फिरताना दिसत होता. त्यामुळे या नग्न व्यक्तीबद्दल नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. हा नग्न व्यक्ती म्हणजे भूत तर नाही ना? अशी भीती अनेकांना वाटत होती. विशेष म्हणजे हा नग्न व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील कैद झाला होता. त्या सीसीटीव्ही फुटेजच्याच आधारावर नवी मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला शोधून काढलं आहे. त्याला पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती ही सराईत चोर असल्याचं उघड झालं आहे. तो निवर्स्त्र रस्त्यांवर फिरुन नागरिकांना घाबरवायचा आणि संधी मिळेल तिथे चोरी करायचा. अखेर त्याच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांनी खूप मोठं यश आलं आहे. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिघा परिसरात या नग्न चोराची दहशत वाढत चालली होती. तो अंगावरील सगळे कपडे काढून फिरायचा. विशेष म्हणजे तो आपल्या शरीराला तेल लावायचा, जेणेकरुन तो पकडला गेला की लगेच लोकांच्या हातातून निसटू शकेल. पण पापाचा घडा कधीना कधी भरतोच. शेवटी कळव्यात राहणाऱ्या या चोराच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (VIDEO : पुण्यातली अतिशय वेदनादायी घटना, आईने पोटच्या लेकराला ट्र्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली जाताना पाहिलं) संबंधित प्रकरणी पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. शहरात रात्रीच्या वेळी एक व्यक्ती नग्न अवस्थेत रस्त्यांवर फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या संबंधी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली होती. नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी सर्वात आधी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. आरोपी नग्न अवस्थेत फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपी हा नग्न अवस्थेत दिघा परिसरातील रस्त्यांवर फिरताना दिसला. विशेष म्हणजे आरोपीचा नग्न अवस्थेत रस्त्यांवर फिरण्याचा व्हिडीओ गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय. खरंतर आपल्याला कोणी पकडू नये म्हणूनच आरोपी कपडे काढून फिरायचा. त्यामुळे दिघा परिसरात त्याची दहशत वाढत चालली होती. पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचला आणि मध्यरात्रीच्या वेळी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चोराला पकडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची पडताळणी केली. सीसीटीव्हीतली नग्न व्यक्ती तोच असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस चोराला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेवून आले. पोलिसांनी अधिकचा तपास केला असता कळवा पोलीस ठाण्यात आरोपीवर आधीपासूनच नऊ गुन्हे दाखल आहेत. पण रबाळे पोलिसांनी काही गुन्हा आरोपीवर दाखल करण्याआधीच त्याला डेंग्यू आजाराची लागण झाली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलीस आता आरोपीची तो बरा झाल्यानंतर चौकशी करणार आहेत.
First published:

Tags: Crime, Mumbai police

पुढील बातम्या