मुंबई, 20 एप्रिल: भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राजसह (Bhojpuri Singer Shilpi Raj) एक विचित्र प्रकार घडला आहे आणि त्यामुळे तिला मनस्ताप सहन कराना लागला आहे. शिल्पी राज हिचा एक कथित प्रायव्हेट व्हिडीओ (Bhojpuri Singer Private video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की तिचा हा व्हिडीओ बॉयफ्रेंडसह आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते रिलेशिनशिपमध्ये आहेत. धक्कादायक बाब म्हणजे व्हायरल होणारा व्हिडीओ (Viral Video) तिसऱ्याच व्यक्तीने शूट केल्याची माहिती मीडिया अहवालातून समोर आली आहे. शिल्पीने हा व्हिडीओ कुठेही शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने लाइव्ह येत विनंती केली आहे की, ‘माझं लग्न आहे. काही लोक व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करत आहेत. तुम्हाला माझं वागणं माहित आहे. काहीही करुन माझी मदत करा. मी कुणाशीही मोठ्या आवाजात देखील बोलत नाही. माझी चूक एवढीच आहे की मी गरीब कुटुंबातील आहे.’ तिच्यावर होणाऱ्या असभ्य भाषेतील टिपण्णीबद्दलही तिने यावेळी भाष्य केले. शिल्पीने हा व्हायरल होणारा व्हिडीओ डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. न्यूज18 लोकमत या व्हिडीओची पुष्टी करत नाही. हे वाचा- Online Ludo खेळता-खेळता पडले प्रेमात; प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा; नेमकं काय घडलं? शिल्पीने तिच्या करिअरमध्ये भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह काम केले आहे. ‘जाड़ा लागत’, ‘बस कर पगली’, ‘झगड़ा’, ‘बबुआ के खुस कर द’, अशी काही तिची प्रसिद्ध गाणी आहेत. ती पाटणा याठिकाणी विविध गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होते. बारावीचा अभ्यास करता करता तिने गाणं गाण्यास सुरुवात केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.