मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Online Ludo खेळता-खेळता पडले प्रेमात; प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा; नेमकं काय घडलं?

Online Ludo खेळता-खेळता पडले प्रेमात; प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा; नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये एक वेगळीच प्रेमाची गोष्ट (love story) समोर आली आहे. ऑनलाईन गेम (online gaming) खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला.

बिहारमध्ये एक वेगळीच प्रेमाची गोष्ट (love story) समोर आली आहे. ऑनलाईन गेम (online gaming) खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला.

बिहारमध्ये एक वेगळीच प्रेमाची गोष्ट (love story) समोर आली आहे. ऑनलाईन गेम (online gaming) खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला.

छपरा, 20 एप्रिल : बिहारमध्ये एक वेगळीच प्रेमाची गोष्ट (love story) समोर आली आहे. ऑनलाईन गेम (online gaming) खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. यानंतर ती तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला आगरा येथून छपरा येथे पोहोचली. यानंतर असे काही घडले की तो तरुण थेट तुरुंगात पोहोचला.

पालकांनी केली अपहरणाची तक्रार

माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी मारहौराच्या अगाहरा गावातील 19 वर्षीय इंटरच्या विद्यार्थ्याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली. तसेच पोलिसांनी मढौरा येथून एका 18 वर्षीय तरुणीलाही ताब्यात घेतले आहे. आगरा येथील तरुणी आणि मढौरा येथील युवक या दोघांमध्ये मोबाईलवर ऑनलाईन लुडो खेळ खेळताना ओळख झाली. यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोन्ही इतके जवळ आले की, 18 वर्षीय तरुणी आपल्या पालकांना न सांगता त्याला भेटायला थेट मढौरा येथे गेली. तर दुसरीकडे हरिपर्वत पोलीस ठाणे अंतर्गत गांधीनगर येथील रहिवासी या तरुणीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली.

हे वाचा - Ganesh Naik: भाजप नेते गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, पोलिसांच्या टीमकडून विविध ठिकाणी शोध सुरू

तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरा येथील एक तरुणी तीन दिवस आधी मढौरा येथील अगाहरा गावात एका तरुणाला घेऊन मढौरा येथे आली होती. तर या तरुणाने या तरुणीला मढौरा स्टेशन रोड मालगोदामच्या जवळ एका भाड्याच्या खोलीत थांबवले होते. तरुणीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर एफआयआरनंतर सक्रिय झालेल्या आग्रा पोलिसांनी मोबाइल नंबर पाळत ठेवून तरुणाची ओळख पटवली होती. सर्व माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

First published:

Tags: Bihar, Crime news, Love