जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टरने लिव्ह इन पार्टनर अन् आईचे खासगी फोटो केले व्हायरल, प्रेयसीने विषयच संपवला!

डॉक्टरने लिव्ह इन पार्टनर अन् आईचे खासगी फोटो केले व्हायरल, प्रेयसीने विषयच संपवला!

डॉक्टरने लिव्ह इन पार्टनर अन् आईचे खासगी फोटो केले व्हायरल, प्रेयसीने विषयच संपवला!

अखेर पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बंगळुरू, 22 सप्टेंबर : बंगळुरूमध्ये दोन दिवसांपूर्वी एका डॉक्टरची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आरोपीचा छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टरचा लिव्ह इन पार्टनरला अटक केली होती. अखेर महिलेने केलेल्या हत्येचं धक्कादायक कारण सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट फोटो शेअर केल्यामुळे डॉक्टर विकास आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये भांडण झालं होतं. लिव्ह इन पार्टनरने आपल्या मित्रांसह मिळून विकासची हत्या केली होती. मृत विकास हा व्यवसायाने डॉक्टर होता आणि एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करीत होता. लवकरच करणार होते लग्न… सोशल मीडियावर अश्लील फोटो शेअर करण्यावरुन डॉक्टर विकास आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनरमध्ये वाद झाला होता. काही दिवसात दोघे लग्नही करणार होते. मात्र त्यापूर्वीच तरुणीने मित्रांसह मिळून प्रियकराची हत्या केली होती. गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले, वाचा नंतर काय घडलं? खासगी फोटोंवरुन झाला होता वाद… मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तिच्या आईचे खासगी फोटो कोणीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. सोबतच हे फोटो काही मित्रांनाही पाठवले होते. तरुणीला जेव्हा याबाबत शोध घेतला तेव्हा तिच्या लिव्ह इन पार्टनगरने खोटा आयडी तयार करून फोटो अपलोड केले होते. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट मित्रांसोबत मिळून घेतला बदला… यानंतर तरुणीने आपल्या तीन मित्रांसब मिळून विकासशी बदला घेण्याचा निर्णय घेतला. तिने तिन्ही मित्रांना घरी बोलावलं. आणि अश्लील फोटो अपलोड करण्यावरुन डॉक्टर विकासला मारहाण सुरू केली. प्रेयसिने बाटली आणि काठीने विकासवर हल्ला केला. यामुळे विकास तेथेच बेशुद्ध झाला. यानंतर आरोपी विकासला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला दुसरीकडे रेफर केलं. तेथे उपचारादरम्यान 14 सप्टेंबर रोजी डॉक्टर विकासचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरभर जखमा होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात