मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात उपचारादरम्यान कैद्याचा मृत्यू, रेल्वे पोलिसांच्या मारहाणीने जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप

पुण्यात उपचारादरम्यान कैद्याचा मृत्यू, रेल्वे पोलिसांच्या मारहाणीने जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप

नागेश पवार हा चोरी आणि दरोड्याच्या 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावली होती.

नागेश पवार हा चोरी आणि दरोड्याच्या 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावली होती.

नागेश पवार हा चोरी आणि दरोड्याच्या 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 24 ऑगस्ट : नागेश रामदास पवार हा कैदी रेल्वे पोलिसांच्या कोठडीत होता. मात्र, उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी घडली. आरोपी नागेश रामदास पवार त्याचे वय 27 होते. तसेच तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवासी होता. मात्र, पुण्यातील हडपसर येथे वास्तव्याला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यु झाला आहे, असा आरोप या वेळी मृताची पत्नी ताई पवार हिने केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

नागेश रामदास पवार हा विविध चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी होता. म्हणून त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. तसेच 17 ऑगस्टला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केली, त्यात तो आजारी पडल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी 24 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मात्र, नागेशच्या मृत्युला रेल्वे पोलीसच जबाबदार आहेत, असा आरोप मृत नागेशची बायको आणि बहिणीने केला आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण -

मृत नागेश पवार हा चोरी आणि दरोड्याच्या 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर २० ऑगस्ट रोजी त्याला थंडी, ताप आला. यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याला फिट येऊन उलटी झाली. डॉक्टरांनी त्याला निमोनिया झाल्याचे सांगितल्यावर आम्ही आयसीयुमध्ये दाखल करत त्याच्यावर उपचार सुरू ठेवले. याचदरम्यान, न्यायालयाने ऑनलाइनच्या माध्यमतातून त्याला पोलिसांनी मारहाण केली का, असे विचारले होते. त्यावेळी मृत आरोपीने नाही, असे सांगितले होते.

हेही वाचा - पुण्यात पोलिसांच्या धाडीत लॉजवर मिळाल्या 3 बंगाली तरुणी; सेक्स रॅकेटसाठी असा होता प्लान

तो कोठडीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. तसेच इन कॅमेरा पंचनामा केला असता देखील त्यावर मारहाणीचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. म्हणून आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. उलट आम्ही माणुसकी दाखवत त्याच्यावर सर्वोतपरी उपचार केले, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

First published:

Tags: Death, Pune, Pune crime news