मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भयंकर प्रकार! चुलत भावाच्या अत्याचारानंतर गर्भवती बहिणीने दिला बाळाला जन्म

भयंकर प्रकार! चुलत भावाच्या अत्याचारानंतर गर्भवती बहिणीने दिला बाळाला जन्म

Shocking! रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ

Shocking! रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अखेर या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

भिवंडी, 29 सप्टेंबर : बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 24 वर्षीय चुलत भावाने 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार (Raped on sister) केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी (Bhiwandi Crime News) तालुका पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या चुलत भावाला आज सकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील एका गावातून पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी तालुका ग्रामीण भागातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तिच्या घरातच आरोपी चुलत भाऊ राहतो. काही महिन्यापासून तो पीडितेवर वारंवार अत्याचार (Raped on sister again and again) करीत होता. त्यातच आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नव्हती. परंतु पीडित अल्पवयीन मुलीने 26 सप्टेंबर रोजी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला. ( Pregnant sister gives birth to baby after cousin borther raped in bhiwandi)

हे ही वाचा-28वर्षीय तरुणीवर 4जिल्ह्यात विविध ठिकाणी बलात्कार; हातपाय बांधून दिल्या नरकयातना

या प्रकाणातील गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ आणि पॉक्सो  कायद्यानुसार  गुन्हा दाखल करून पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील अलखीवली गावातून आरोपीला अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.

देशभरात बलात्काराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान काल नाशिक शहरातील पवननगर परिसरात एका विधवा महिलेवर बलात्कार (Rape on widow) करण्यात आला होता. नराधमाने पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत पीडितेसोबत अत्याचार केले होते. याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना ताजी असताना, नाशकात महिला अत्याचाराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी एका चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीसोबत अत्याचाराचा (2 men raped 4th grade school girl) कळस गाठला आहे.

First published:
top videos

    Tags: Bhiwandi, Crime news, Rape