मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /हा खेळ सावल्यांचा! भूत सारखं स्वप्नात यायचं; घाबरलेल्या पोलिसाचा टोकाचा निर्णय

हा खेळ सावल्यांचा! भूत सारखं स्वप्नात यायचं; घाबरलेल्या पोलिसाचा टोकाचा निर्णय

प्रभाकरण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्याला झोपेत भूताचे वाईट स्वप्न यायचे. या स्वप्नांमुळे तो प्रचंड त्रस्त झाला होता.

प्रभाकरण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्याला झोपेत भूताचे वाईट स्वप्न यायचे. या स्वप्नांमुळे तो प्रचंड त्रस्त झाला होता.

प्रभाकरण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्याला झोपेत भूताचे वाईट स्वप्न यायचे. या स्वप्नांमुळे तो प्रचंड त्रस्त झाला होता.

चेन्नई, 17 नोव्हेंबर : या जगात भूत (Ghosts) वगैरे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे सगळे मनाचे भाव असतात. पण काही माणसं अस्तित्वातच नसलेल्या भूताला इतकं घाबरतात (Fear) की त्या भीतीमुळे त्यांना कदाचित हृदय विकाराचा झटका येईल. तामिळनाडूत (Tamilnadu) अशीच काहिशी घटना समोर आली आहे. तामिळनाडूत एका पोलीस कर्मचाऱ्याने भूताच्या भीतीने थेट आत्महत्या (Suicide) केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला भुताची वाईट स्वप्ने (Bad dreams) पडत होती. त्यामुळे तो घाबरला होता. त्यातून त्याने आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात घडली आहे. मृतक 33 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं प्रभाकरण असं नाव आहे. त्याला वारंवार भूतांची भीती वाटायची. भूत आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला त्रास देतात, असं तो म्हणायचा. त्यातूनच त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. प्रभाकरणला पत्नी, लहान मुलगा आणि मुलगी देखील आहेत. त्याने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात

झोपेत भूताचे वाईट स्वप्न यायचे

खरंतर प्रभाकरण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्याला झोपेत भूताचे वाईट स्वप्न यायचे. या स्वप्नांमुळे तो प्रचंड त्रस्त झाला होता. एक स्वप्न तर त्याला वारंवार सतवायचं. त्या स्वप्नात तो एका भाजलेल्या महिलेचा गळा दाबताना दिसायचा. हे स्वप्न पडल्यानंतर प्रभाकरण प्रचंड घाबरायचा. तो भीतीने थरथरायला लागायचा.

हेही वाचा : सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO

घरात पत्नी-मुलं नसताना टोकाचं पाऊल

विशेष म्हणजे प्रभाकरणने सगळ्या वाईट स्वप्नांपासून मुक्तता व्हावी यासाठी ज्योतिषांची देखील मदत घेतली होती. त्याने ठीक होण्यासाठी 15 दिवसांची सुट्टी घेतली होती. तसेच त्याने स्वत:ला घरातील देवघरात बंदीस्त केलं होतं. या दरम्यान त्याची पत्नी आणि मुलं एका लग्नाच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी प्रभाकरण घरात एकटाच होता. घरात कुणी नसल्याने त्याला आणखी एकटं वाटू लागलं. त्याला पुन्हा भुताची भीती वाटायला लागली. त्याने या भीतीपासून मुक्तता मिळावी यासाठी टोकाचा निर्णय घेतला. त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रभाकरणची पत्नी आपल्या मुलांसोबत घरी आली तेव्हा तिने आपल्या पतीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह बघितला. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

First published: