शिवाजी गोरे, रत्नागिरी 09 जुलै : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक पथक नियुक्त केलं असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 2 जुलै रोजी तालुक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बेपत्ता झाला. दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असं सांगून घरातून निघाली. आराध्य (वय 7) आणि श्री (वय 4) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर 1 या शाळेत सोडवते असं सांगून ती घरातून निघून गेली. मात्र, तीदेखील अद्याप परतलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भरत याला घरातून निघून जाण्याची सवय आहे, तो यापूर्वीही असाच बेपत्ता झाला होता. मात्र यावेळी पत्नी आणि दोन लहान मुलंही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक आणि ग्रामस्थ चिंतेत असून शोशोध सुरू आहे. या सगळ्या खळबळजनक प्रकाराचा छडा लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. उपनिरीक्षक दर्जाच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेलं पथक या कुटुंबाच्या शोधार्थ रवाना झालं आहे. लवकरच काही माहिती हाती मिळेल, असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र या प्रकरणी अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची शक्यता तर नाही ना ? याचाही तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू केला आहे. सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, कुटुंबीयांनी मृतदेह नदीत सोडला, मग चिठ्ठीत लिहिलं असं काही की जाणून बसेल धक्का दापोली तालुक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर याच्यासोबत मंडणगडमधील कुंबळे या ठिकाणी गेला होता. लाकडी पट्टी आणण्यासाठी जात आहे, असं सांगून तो घरातून निघून गेला. तो अद्यापही घरी आलेलाच नाही. दुकानात जातो असं सांगून निघून गेलेल्या भरत भेलेकरचा कुटुंबासह नातेवाई मित्र-मंडळींनीही सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच न सापडल्यामुळे अखेर दापोली पोलीस ठाण्यात भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. भरत भेलकर बेपत्ता झाल्याच्या दुस-याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही मुलांना शाळेत सोडवण्यासाठी घरातून निघाली. मात्र तीसुध्दा परतलीच नाही. आराध्य आणि श्री या चिमुकल्यांचा तसेच सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत. तिच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क केला गेला मात्र संपर्कच होत नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य आणि श्री या बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहा्ययक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.