जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, कुटुंबीयांनी मृतदेह नदीत सोडला, मग चिठ्ठीत लिहिलं असं काही की जाणून बसेल धक्का

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, कुटुंबीयांनी मृतदेह नदीत सोडला, मग चिठ्ठीत लिहिलं असं काही की जाणून बसेल धक्का

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

सर्पदंशामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर भूतबाधा उतरविण्यासाठी कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह नारायणी नदीत सोडून दिला.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

पाटणा 09 जुलै : सध्याच्या वैज्ञानिक युगात एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप पुढे जात आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी यश मिळवलं जात आहे. अशा परिस्थितीत काही लोक मात्र तंत्र-मंत्राच्या चक्रात अजूनही अडकलेले आहेत. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. यात डॉक्टरांनी एका तरुणाला मृत घोषित केलं, तरीही त्याचं कुटुंब मात्र त्याला जिवंत करण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेत आहे. कुटुंबीयांनी मृतदेहासोबत असं काही केलं, जे ऐकून कोणीही हैराण होईल. ही घटना पश्चिम चंपारणमधील बगहा येथील आहे. घटनेत धनहा पोलीस स्टेशन परिसरात सर्पदंशामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर भूतबाधा उतरविण्यासाठी कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह नारायणी नदीत सोडून दिला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तरुणाला साप चावला आणि त्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याऐवजी त्याला अंधश्रद्धेच्या मार्गाने बरं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकृती न सुधारल्याने गुरुवारी काही लोकांच्या सांगण्यावरून या तरुणाला कुशीनगर येथील पडरौना जिल्हा रुग्णालयात दाखविण्यात आलं, तिथे या तरुणाला मृत घोषित करण्यात आलं. मात्र नातेवाईक तरुणाला मृत मानण्यास तयार नव्हते. Crime News : माणूस की राक्षस? पत्नीची क्रूरपणे हत्या, मेंदू चपातीत भरुन खाल्ला, कवटीचा अ‍ॅश ट्रे अन्.. शुक्रवारी दिवसभर बाधा उतरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तरुणाच्या अंगातून दुर्गंधी येऊ लागल्याने केळीच्या खोडावर ठेऊन नदीत त्याचा मृतदेह सोडण्यात आला. नातेवाईकांचा असा विश्वास आहे, की असं केल्याने मृतदेह नदीत वाहून जाईल, या वेळी कोणी भूतबाधा उतरवणारा हा मृतदेह पाहिल आणि तो मृत तरुणाला जिवंत करेल. एवढंच नाही तर ज्या केळीच्या खोडावर तरुणाला पाण्यात तरंगवण्यात आलं आहे, त्यावर तरुणाचा पत्ता एका कागदावर लिहून लॅमिनेशन करून लावण्यात आला आहे. त्याला कोणी जिवंत केलं तर तो घरापर्यंत पोहोचावा, म्हणून हे केलं गेलं आहे. भोले प्रजापती (वय 31, रा. तमकुहा) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण स्वत:च्या घरात मातीचे भांडे ठेवण्यासाठी बांबूची फळी बनवत असताना त्याला साप चावला. यानंतर घरातील सदस्य भूतबाधा उतरवण्यातच अडकले. तमकुहा पंचायतीचे प्रमुख फारुख अन्सारी यांनी सांगितलं की, तरुणाचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला आहे, तरीही कुटुंबातील सदस्य अजूनही भूतबाधेचाच विचार करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात