नवी दिल्ली, 25 जानेवारी : काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेला श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला या प्रकरणाचा तपास सध्या दिल्ली पोलीस करत आहेत. या प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं होतं. अंगावर शहारा आणणारं हे प्रकरण अजून ताजच आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या का केली, याबाबत पोलिसांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले पोलीस -
दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली कारण ती घटनेच्या दिवशी दुसऱ्या मित्राला भेटायला गेली होती आणि त्यामुळे तो खूप संतापला होता. पोलिसांनी मंगळवारी येथील साकेत न्यायालयात श्रद्धा हत्याकांडात पूनावाला विरुद्ध 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात आता आफताबची न्यायालयीन कोठडी दोन आठवड्यांनी वाढवून 7 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे की, आरोपीने वालकरचा मृतदेह कापण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे वापरली असून त्यातील काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना सह पोलिस आयुक्त (दक्षिण) मीनू चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणात 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत आणि पूनावाला याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या) आणि कलम (201) गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी म्हणाले, "घटनेच्या दिवशी, श्रद्धा वालकर तिच्या मित्राला भेटायला गेली होती. हे आफताब पुनावाला याला आवडले नाही. त्यानंतर तो हिंसक झाला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली.
आरोपपत्रानुसार, मेहरौली पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पोलिसांकडून श्रद्धा विकास वालकर हरवल्याची तक्रार प्राप्त झाली, त्यानंतर मेहरौली पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आणि पीडितेच्या वडिलांची चौकशी करण्यात आली. पूनावाला आणि वालकर हे शेवटचे मेहरौली भागात भाड्याच्या घरात दिसले होते. त्या आधारे पूनावालाची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.
हेही वाचा - मुलीने केलं Love Marriage, कोर्टात पित्याचं भयानक कृत्य, गोळ्या झाडून...
तपासादरम्यान डीसीपी (दक्षिण) यांच्या नेतृत्वाखाली नऊ पथके आणि विशेष तपास पथक (एसआयटी) देखील स्थापन करण्यात आली होती. तसेच हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणातील गुरुग्राममध्येही टीम पाठवण्यात आली होती. चौकशीदरम्यान असे आढळून आले की शरीराचे अवयव तुकडे केले गेले होते आणि अनेक शोध पथके तयार करण्यात आली होती. आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपीच्या सांगण्यावरून छत्तरपूरच्या मेहरौली जंगल परिसरात झडती घेण्यात आली आणि पोलिसांना तेथे काही हाडे सापडली.
“आम्ही वैज्ञानिक पद्धती वापरल्या आणि तपासादरम्यान, एफएसएल, सीएफएसएल आणि गुन्हे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. रक्ताचे नमुने आणि हाडांच्या चाचण्या झाल्या आणि डीएनए टेस्टही करण्यात आल्या. डीएनए माइटोकॉन्ड्रियल प्रोफाइलिंगच्या प्रगत तंत्राचा वापर करून तपासही हैदराबादमध्ये करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज स्थापित करण्यासाठी एक स्वतंत्र समर्पित टीम तयार करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. मोबाइल फोन, कॅमेरे आणि लॅपटॉप, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशनसह अनेक डिजिटल पुरावे तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. डीसीपी म्हणाले, “आमच्याकडे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. आमच्याकडे साक्षीदार आणि डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder