नितीन नांदुरकर, जळगाव 13 ऑक्टोबर : जळगावमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात जळगाव शहरात मध्यवर्ती भागात एका कंपनीच्या नावे असणाऱ्या ऑफिसमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. याठिकाणी छापा टाकत संशयितरित्या परिस्थितीत आढळलेल्या दोन पुरुषांसह सहा तरुणींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वर्गमित्राकडून 20 वर्षांची विद्यार्थिनी झाली गर्भवती, अन् तिची रवानगी थेट तुरुंगात
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नवी पेठ भागात एका कंपनीच्या नावे सुरू असलेल्या कार्यालयात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहर पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहराच्या मध्यवर्ती भागात उघड झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
असा उघड झाला प्रकार -
समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये अवैध सेक्स रॅकेट्स अनेक ठिकाणी सुरू आहेत. तरीही पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत होता. यामुळे काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी मोठी कारवाई करत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर आता शहरातील नवीपेठ परिसरातील महावीर बँकेच्या पाठीमागे असलेल्या एका ऑफिसच्या खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.
धक्कादायक! विद्यार्थिंनींचे कपडे बदलताना व्हिडिओ CCTV मध्ये कैद, अशी आली घटना समोर
मिळालेल्या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पथकाने छापा टाकला. यावेळी कार्यालयात वेश्यव्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी 2 पुरुष ग्राहक आणि सहा तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Jalgaon, Sex racket