मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वर्गमित्राकडून 20 वर्षांची विद्यार्थिनी झाली गर्भवती, अन् तिची रवानगी थेट तुरुंगात

वर्गमित्राकडून 20 वर्षांची विद्यार्थिनी झाली गर्भवती, अन् तिची रवानगी थेट तुरुंगात

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अल्पवयीन असताना एप्रिलमध्ये तो बेपत्ता झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chennai, India
  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 12 ऑक्टोबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यातच आता तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात एका 20 वर्षीय गर्भवती महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्या अल्पवयीन वर्गमित्राशी लग्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

अल्पवयीन असताना एप्रिलमध्ये तो बेपत्ता झाला होता आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीसोबत राहत होता. यानंतर किशोरवयीन मुलाच्या पालकांनी मुलाचा शोध घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तिच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या न्यायालयाने आरोपी मुलीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसर्‍या प्रकरणात, कुड्डालोर जिल्ह्यात एका 17 वर्षांच्या मुलाला 16 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगळसूत्र टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल -

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकावर उभ्या असलेल्या मुलीच्या गळ्यात एक मुलगा मंगळसूत्र घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. आता पोलिसांनी या युवकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला निरीक्षण गृहात पाठवले आहे.

हेही वाचा - अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने मुलीसोबत संबंध ठेवले होते. आता त्यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे. मंगळसूत्र घातलेला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Chennai, Crime news, Tamilnadu