इंदूर, 19 सप्टेंबर : तीन वर्षांच्या छोट्या मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हत्येचा (Police reveals murder after three year old talk) सुगावा लावला आहे. एका महिलेच्या हत्येचा (Murder of a female) तपास पोलीस करत असताना या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईसोबत काय घडलं, याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांना खऱ्या खुन्याचा (Police found murderer) शोध लागला. नेमकं काय घडलं? मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये एका महिलेची हत्या झाल्याचं उघड झालं. पोलीस या घटनेचा तपास करत होते. तपासादरम्यान, हत्या झालेल्या महिलेच्या मुलाशी पोलीस बोलले. या तीन वर्षांच्या मुलाने त्याच्या बोबड्या स्वरात पोलिसांना माहिती दिली. त्या दिवशी वडील आपल्या आईला काठीने मारत होते आणि जेवण चांगलं का बनवत नाहीस, असं विचारत होते. खूप वेळ वडिलांनी आईला दांडक्याने मारहाण केल्यामुळे आई खाली पडली, असं या मुलाने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी पतीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने तोंड उघडले. सततची भांडणे इंदूरमध्ये यशोदा आणि विनोद लोहा हे दांपत्य राहत होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये सातत्यानं भांडणं होत होती. पतीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही यशोदाने आपल्या घरच्यांना दिली होती. सतत जीवे मारण्याची धमकी देणं, मारहाण करणं असे प्रकार होत होते. नीट स्वयंपाक करत नसल्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर पतीने यशोदाला बेदम मारहाण केली. पाईप आणि दांडक्याने बेदम मारहाण करताना वर्मी घाव लागल्यामुळे यशोदाचा मृत्यू झाला. हे वाचा - अफगाणिस्तानात अन्नाची टंचाई, पोटासाठी 1 लाखाची वस्तू विकली जातेय 25 हजारात पोलिसांनी पती विनोदवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या हत्येमागे आणखी काही कारणं आणि धागेदोरे आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.