जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रात्रीच्यावेळी मदत करायचं सोडून IIT तरुणीसोबत पोलिसाने अश्लील..; मुंबईतील प्रकाराने खळबळ

रात्रीच्यावेळी मदत करायचं सोडून IIT तरुणीसोबत पोलिसाने अश्लील..; मुंबईतील प्रकाराने खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ही धक्कादायक घटना काल पहाटेच्या सुमारास घडली

  • -MIN READ Navi Mumbai,Thane,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 31 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने आयआयटी मधील तरुणीचा विनयभंगाचा केल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पहाटेच्या वेळी फिरायला गेले होते. यावेळी पोलिसांनी मुलीला अश्लिल प्रश्न विचारले, असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर या मुलगी आणि तरुणाने जवळच्या पोलीस ठाण्यात संबंधित तक्रार द्यायला गेले असता त्या पोलीस ठाण्यातून त्यांना योग्य तसा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर या दोघांनी त्याच्या आयआयटीमधील वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली असता त्यांनी संबंधित वरिष्ठांना ही बाब सांगितल्यानंतर त्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही धक्कादायक घटना काल पहाटेच्या सुमारास घडली. मुलासोबत बोलत असताना पामबीचवर पोलिसाने आयआयटीमधील तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी नवी मुंबई मधील सानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राठोड याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करून पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच आरोपी राठोड याला निलंबित करण्यात आले आहे. हेही वाचा -  नागपुरात धक्कादायक घटना, प्रेमसंबंधातून विवाहितेला पळविले, अन् पतीसोबत….

आई म्हणाली, त्याच्यासोबत संबंध ठेवू नकोस…

ठाणे जिल्ह्यात आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंब्रा परिसरात एका 17 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. मृत महिलेला तिची मुलगी आणि प्रियकर यांच्यातील संबंधांवर आक्षेप होता. मुंब्रा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बुधवारी मुंब्रा परिसरात घडली. घटनेनंतर प्रियकर आणि प्रेयसी दोन्ही आरोपी फरार आहेत. मुंब्रा पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मृत महिलेचे वय 37 होते. मृत महिला आपल्या किशोरवयीन मुलीला या मुलाशी मैत्री करण्यावरुन रागावली होती. यामुळे या तरुणीला राग आला होता. त्यामुले मृत महिलेच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईला मारण्याचा कट रचला. तसेच संधी मिळताच आपल्या आईची चाकूने वार करत हत्या केली. यानंतर मृताच्या मुलगी आपल्या प्रियकरासह फरार झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात