मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /370 महिला, 7 मोबाईल आणि असंख्य सिमकार्ड; Video Call करून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

370 महिला, 7 मोबाईल आणि असंख्य सिमकार्ड; Video Call करून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

व्हिडीओजवळ शेयर, कमेंटजवळील तीन डॉटवर टॅप करून लिंक कॉपी करावी लागेल. त्यानंतर ब्राउजरमध्ये fbdown.net ओपन करा.

व्हिडीओजवळ शेयर, कमेंटजवळील तीन डॉटवर टॅप करून लिंक कॉपी करावी लागेल. त्यानंतर ब्राउजरमध्ये fbdown.net ओपन करा.

35 वर्षाच्या एका व्यक्तीनं जवळपास 370 महिलांना व्हिडिओ कॉल करत अश्लील कृत्य (Obscene Video Calls To Women) केलं आहे. अनेकदा व्हिडिओ कॉल दरम्यानच या व्यक्तीनं आपले संपूर्ण कपडे काढले.

लखनऊ 26 जून : 35 वर्षाच्या एका व्यक्तीनं जवळपास 370 महिलांना व्हिडिओ कॉल करत अश्लील कृत्य (Obscene Video Calls To Women) केलं आहे. अनेकदा व्हिडिओ कॉल दरम्यानच या व्यक्तीनं आपले संपूर्ण कपडे काढले. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, प्रकरणाच्या तपासात असं समोर आलं, की या व्यक्तीनं महिलांना केलेले व्हिडिओ कॉल रेकॉर्ड (Video Call Recording) केले आणि याच्याच माध्यमातून त्यांना ब्लॅमेलही केलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) बलियामधील आहे.

लग्नानंतर 3 दिवसातच सासरकडच्यांकडून नवरीचा अमानुष छळ; गुप्तांगावर गरम सळईनं चटके

आरोपीनं महिलांना अशी धमकी दिली, की याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तो हे व्हिडिओ त्यांच्या कुटुंबीयांना पाठवेल आणि सोशल मीडियावर व्हायरल करेल. पोलिसांनी सांगितलं, की आरोपीचं नाव शिव कुमार वर्मा असं आहे. त्यानं ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. त्याचं स्टेशनरीचं एक दुकान आहे. आरोपीनं 15 वेगवेगळ्या जिल्ह्यांत राहाणाऱ्या महिलांना व्हिडिओ कॉल केला. यासाठी त्यानं 7 मोबाईल फोन आणि अनेक सिम कार्डचा वापर केला. पोलिसांना या आरोपीविरोधात पहिली तक्रार मागील वर्षी लखनऊमधून मिळाली होती. पीडितेनं महिला हेल्पलाईन नंबर 1090 वर यासंबंधी तक्रार केली होती.

तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याची पतीची होती इच्छा; पत्नीनं गुप्तांग कापलं अन्...

तपासात असं समोर आलं, की हा आरोपी कोणताही रँडम नंबर घेऊन त्याच्या डिटेल ट्रू कॉलरवर तपासायचा. हा एखाद्या मुलीचा फोन नंबर असल्यास तो त्यावर व्हिडिओ कॉल करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलदरम्यान हा आरोपी आपले कपडे काढायचा आणि व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यास सुरुवात करायचा. जोपर्यंत महिलेच्या हा प्रकार लक्षात येई आणि ती फोन बंद करण्याचा प्रयत्न करत, तोपर्यंत तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. यानंतर तो महिलांना ब्लॅकमेल करायचा. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.

First published:

Tags: Crime, Porn video, Video call