पतीचं संतापजनक कृत्य; बनावट FB खातं काढून पत्नीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल, लज्जास्पद घटना उघडकीस

: आपल्याच पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर (Video on Social Media) पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकाला अटक केली आहे. त्यानं आपल्या पत्नीच्या फोटोसोबत रेट लिस्ट आणि फोन नंबरदेखील पोस्ट केला.

: आपल्याच पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर (Video on Social Media) पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकाला अटक केली आहे. त्यानं आपल्या पत्नीच्या फोटोसोबत रेट लिस्ट आणि फोन नंबरदेखील पोस्ट केला.

  • Share this:
    नवी दिल्ली 18 जून : आपल्याच पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर (Video on Social Media) पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकाला अटक केली आहे. ही घटना दिल्लीजवळील (Delhi)गौतमबुद्ध नगरमधील आहे, ओरीपा पतीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हा आरोपी हरियाणातील भोडसी येथील रहिवासी आहे. ही कारवाई नोएडाच्या इकोटेक 3 ठाणे पोलिसांनी केली आहे. नोएडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाचा रहिवासी असलेल्या रविंद्र राघवचं लग्न सुष्मितासोबत (काल्पनिक नाव) झालं होतं. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात या नवरा-बायकोमध्ये कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला. यानंतर सुष्मितानं आपलं सासर सोडलं आणि ती ग्रेटर नोएडामध्ये येऊन राहू लागली. तिने एका कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. कहर! तब्बल 50 वेळा अटक झालेली 'ही' महिला आहे तरी कोण? पत्नीचा ग्रेटर नोएडा इथे राहाण्याचा आणि नोकरी करण्याचा निर्णय रविंद्रला अजिबातही पटला नाही. यानंतर त्यानं पवन धनखड नावानं एक फेक फेसबुक अकाऊंट उघडलं आणि आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले. त्यानं स्वतःच्याच पत्नीला सोशल मीडियावर कॉल गर्ल असल्याचं सांगितलं. त्यानं आपल्या पत्नीच्या फोटोसोबत रेट लिस्ट आणि फोन नंबरदेखील पोस्ट केला. देव तारी त्याला कोण मारी! 400 फूट खोल दरीत कार कोसळूनही तिघं बचावले पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला या गोष्टीची भनक तेव्हा लागली जेव्हा तिच्या फोनवर वारंवार अनोळखी लोकांचे फोन येऊ लागले. लोक तिच्यासोबत कॉल गर्लप्रमाणं बोलत होते. याच कारणामुळे पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास केला असता, महिलेचा पतीच याप्रकरणाच दोषी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. यासोबत या आरोपीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: