• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ...म्हणून आतापर्यंत तब्बल 50 वेळा 'या' महिलेला झाली अटक

...म्हणून आतापर्यंत तब्बल 50 वेळा 'या' महिलेला झाली अटक

मुंबईतल्या एका 38 वर्षीय (38-year-old woman) महिलेला चोरीच्या घटनेत आतापर्यंत तब्बल 50 वेळा अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जून: मुंबईतल्या एका 38 वर्षीय (38-year-old woman) महिलेला चोरीच्या घटनेत आतापर्यंत तब्बल 50 वेळा अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2006 सालापासून या महिलेला 50 वेळा तुरुंगात जावं लागलं आहे. घरकाम (house thefts)करुन चोरी केल्याचा आरोप या महिलेवर आहे. आता पुन्हा गुरुवारी या महिलेला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी (the property cell) सेलनं 2500 डॉलर्स (1 लाख 85 हजार 212) चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. वनिता गायकवाड असं महिला आरोपीचं नाव आहे. आरोपी महिलेनं आपल्याला पकडू नये यासाठी प्रत्येक वेळी आपलं नाव आणि पत्ता बदलायची, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 26 मे रोजी जुहू पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार करण्यात आली. डिझायनर दिपिका गांगुली ज्या विलेपार्ले पश्चिम येथे राहतात. दिपिका याच्या घरात चोरी झाली होती. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितलं की, सध्या आम्ही या चोरीच्या घटनेचा तपास करत आहोत. हेही वाचा- जालन्यात गुन्हेगारी वाढतेय?, एकाच दिवशी घडल्या 'या' विचित्र घटना  पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, गांगुली यांनी पोलिसांना माहिती दिली की, आरोपी गायकवाड हिनं आपल्याला कागदपत्रे हरवल्याचं सांगितलं आणि काही दिवसात ती कागदपत्रे सबमिट करते असं म्हटलं. मात्र नोकरीवर ठेवल्यानंतर 10 दिवसांतच गायकवाडनं पैसे चोरी करुन फरार झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि क्राईम रेकॉर्डद्वारे महिला आरोपीची ओळख पटविली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. आरोपी वनिता गायकवाडला आतापर्यंत 50 पेक्षा जास्त वेळा अटक करण्यात आली आहे. ती अनेक वेळा दोषी आढळून आल्याचं प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले. आरोपी वनिता गायकवाडला विक्रोळी येथून अटक करण्यात आली आहे. तिला दोन मुलंही आहेत जी वेगळी राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
  Published by:Pooja Vichare
  First published: