मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आरिफने मी अभय असल्याचं सांगत विवाहित तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, सत्य समोर येताच बसला जोरदार धक्का

आरिफने मी अभय असल्याचं सांगत विवाहित तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, सत्य समोर येताच बसला जोरदार धक्का

पोलिसांनी अटक केलेले आरोपी

पोलिसांनी अटक केलेले आरोपी

एका तरुणाने तिला फोन करून आपले नाव अभय मिश्रा असल्याचे सांगितले.

  • Local18
  • Last Updated :
  • Mirzapur, India

मंगला तिवारी, प्रतिनिधी

मिर्झापूर, 24 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. अनैतिक संबंध, बलात्कार, खून, आत्महत्या यांसारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - 

अभय मिश्रा असे भासवून आरिफ नावाच्या आरोपी तरुणाने एका विवाहित तरुणीला नोकरी लावून देण्याच्या नावाखाली प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी तरुणीशी अवैध संबंध बनवून तिचे धर्मांतरही केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

मिर्झापूरच्या देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली.

तक्रारीत तिने म्हटले की, एका तरुणाने तिला फोन करून आपले नाव अभय मिश्रा असल्याचे सांगितले. यानंतर त्याने मला नोकरी देण्याचे आश्वासन देऊन अंबाला येथे नेले. तिथे पोहोचल्यावर त्याने तिला बंधक बनवून तिच्यावर अनेक महिने बलात्कार केला. यादरम्यान तरुणीचा अश्लिल व्हिडिओही बनवण्यात आला. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला जबरदस्तीने नमाज शिकवण्यासोबतच बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली.

तरुणीने तक्रारीत पोलिसांना सांगितले की, अंबाला येथील तरुण तिला सुलतानपूर येथील त्याच्या घरी घेऊन आला. जिथे मुलीला वास्तव कळले की ती ज्याला अभय मिश्रा मानत होती तो आरिफ आहे. यानंतर पीडितेने कशीतरी तेथून पळ काढला आणि पुन्हा मिर्झापूरला येऊन हा सगळा प्रकार पतीला सांगितला. विशेष म्हणजे 23 मार्च रोजी मुलगी तिच्या माहेरी गेली होती. तेथून ती बेपत्ता झाली. तपासादरम्यान ती अंबाला येथे असल्याची माहिती मिळाली.

मिर्झापूरचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, लव्ह जिहाद, धर्मांतर आणि बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. ज्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी प्रथम मुलीला अंबाला येथे घेऊन गेला. तेथे बलात्कार करून तिचे धर्मांतर केले गेले. यानंतर त्याने तिला सुलतानपूरलाही आपल्या घरी आणले. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून तिघांनाही अटक केली. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी आरिफचे वडीलही आरोपी आहेत. त्यालाही अटक करण्यात येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Local18, Rape, Uttar pradesh