नवी दिल्ली 15 मे : असं म्हणतात की कुत्रा हा सर्वात निष्ठावान प्राणी आहे आणि माणसाचा सर्वात चांगला मित्र देखील आहे. मात्र माणसाला बऱ्याचदा याचं भान राहात नाही. त्याला असं वाटते की तो प्रत्येक सजीवाचा मालक आहे आणि पाळीव प्राणी पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात आहेत. यामुळे अनेकवेळा ते आपल्या पाळीव प्राण्यांवर अत्याचार करू लागतात. नुकतंच एका महिलेनं असंच काही केलं. तिने आपल्या पाळीव कुत्र्यांवर अनेकदा एअर गनने हल्ला केला
(Woman shoot dogs with pellet gun), ज्याबद्दल जाणूनच लोक थक्क झाले आहेत.
मुलीनं X-Ray प्रमाणे दृष्टी असल्याचा केला होता दावा! समोर आलं धक्कादायक सत्य
डेली स्टारच्या वृत्तानुसार, फ्लोरिडा येथील रहिवासी 37 वर्षीय जेमी लिन कुजावा हिला पोलिसांनी अटक केली आहे
(Woman Arrested for Animal Cruelty) कारण तिने तिच्या पाळीव प्राण्यांचा खूप छळ केला होता. जेमीकडे 3 पाळीव कुत्री, एक मांजर, एक फेरेट आणि एक पक्षी होता. तिच्या शेजाऱ्यांनी गेल्या महिन्यात हर्नांडो काउंटी शेरीफच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती, की त्यांनी जेमीच्या घरी अनेकदा एअर गन आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकला आहे.

19 एप्रिल रोजी प्राणी नियंत्रण अधिकारी महिलेच्या घरी आले असता त्यांनी बीबी एअर गनबाबत चौकशी केली. महिलेनं आपल्याजवळ बंदूक असल्याचं स्पष्टपणे नाकारलं. तिने सांगितलं की तिच्या तीन कुत्र्यांच्या शरीरावर दिसणार्या जखमा, त्यांनी आपापसात भांडण केल्याने झाल्या आहेत. मात्र ती महिला तिच्या कुत्र्यांच्या लसीकरणाची माहितीही देऊ शकली नाही तेव्हा अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकारी पुन्हा आले तेव्हा त्यांना पुन्हा कुत्र्यांच्या पायावर ताज्या जखमा दिसल्या. त्यांनी हे तपासण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांना इतका त्रास होत होता की ते त्यांच्या पायाला हातही लावू देत नव्हते.
डॉक्टरकडून रुग्णांची सर्वात मोठी फसवणूक उघड, निघाला 94 मुलांचा 'बाप'
जेव्हा महिलेने तिचे दोन श्वान विभागाकडे सुपूर्द केले, तेव्हा त्यांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये असं दिसून आलं की कुत्र्यांच्या शरीरात अजूनही बंदुकीच्या गोळ्या आहेत. एका कुत्र्याच्या शरीरात 61 BB म्हणजे पेलेट्स आणि 19 शिशाच्या गोळ्या होत्या. तर दुसऱ्या कुत्र्याच्या शरीरात 71 बीबी पेलेट आणि 22 शिशाच्या गोळ्या होत्या. याबद्दल विचारलं असता महिला म्हणाली की कुत्रा जेव्हा कुंपण ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हाच ती गोळी मारायची. ही बाब उघड झाल्यानंतर जेमीवर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोप सिद्ध झाल्यास तिला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 38 लाखांचा दंड भरावा लागू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.