नवी दिल्ली, 14 जुलै: दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा (Old woman) खून करून (Murder) फरार (Absconding) झालेल्या पती-पत्नीला (Husband and wife) पोलिसांनी अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची दोघांनी दोरीनं गळा आवळून हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले. मात्र पोलीस तपासात सत्य (Truth) उघड झालंच.
अशी घडली घटना
दिल्लीतील द्वारका परिसरात एका घरात राहणाऱ्या पती-पत्नीने शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेकडून दीड लाख रुपये उधार घेतले होते. कबूल केलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने या महिलेनं पैशांसाठी तगादा लावला होता. त्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी पती-पत्नी दोघांनी त्या महिलेचा खून करण्याची योजना आखली. महिला घरात एकटी असताना दोघं घरात घुसले आणि दोरीनं गळा आवळून या महिलेची हत्या केली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
या जोडप्यानं खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी एक कल्पना लढवली. त्यांनी बाजारातून तीन मोठ्या बॅगा आणल्या. घरातील भाजी चिरण्याच्या सुरीने मृतदेहाचे बारीक तुकडे करून ते तीन वेगवेगळ्या बँगांमध्ये भरले आणि नाल्यात फेकून दिले. त्यानंतर या जोडप्यानं दिल्ली सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मृत महिलेच्या नातेवाईकांनी महिला गायब असल्याची तक्रार केली, तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला.
हे वाचा -महिलेच्या गळ्यातील सोनं चोरणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दिली भयंकर शिक्षा
असा लागला खुनाचा शोध
महिलेच्या शेजारील फ्लॅट रिकामा असल्यानंतर पोलिसांना संशय आला. त्यांनी महिलेच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यावेळी शेजारील पती पत्नी बॅगा भरून घेऊन जात असताना दिसले. त्यानंतर पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे पती-पत्नीचा शोध घ्यायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील बरेलीत त्यांचं लोकेशन सापडलं. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.