नवी दिल्ली, 2 जानेवारी : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने सांगितलं की, लग्नापूर्वी कोणताही आजार लपवणं धोका आहे. न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करीत 16 वर्षांपूर्वी केलेलं लग्न रद्द करण्याचा निर्णय दिला. हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने सांगितलं की, व्यक्तीचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे आणि तो कोणत्याही संकल्पाशिवाय या नात्यात अडकला आहे.
उच्च न्यायालयाने सांगितलं की, लग्न केवळं चांगल्या आठवणी पुरेशा नसतात. तर लग्नबंधनात दोघांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासंबंधित आजार असलेल्या व्यक्तीसोबत संसार करणं सोपं नसतं. खरं पाहता अशा व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी वाढतात, याशिवाय त्याच्या वा तिच्या पार्टनरलाही या आव्हानांचा सामना करावा लागतो.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
या दाम्पत्याचं लग्न 10 डिसेंबर 2005 मध्ये झालं होतं. त्यांनी आरोप केला आहे की, हे लग्न फसवून करण्यात आलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व तिच्या कुटुंबीयांनी धोका दिला आहे. त्यांनी महिलेल्या मानसिक आजाराबाबत काहीच माहिती दिली नाही.
त्यांनी दावा केला आहे की, लग्नापूर्वीच महिला एक्यूट सिजोफ्रेनियाने ग्रस्त होती. हनिमूनच्या दिवशी महिलेचा वागणं खूप विचित्र होतं. व्यक्तीने कोर्टात सांगितलं की, त्याने महिलेला अनेक डॉक्टरांना दाखवलं. ती स्क्रिजोफिनियाने पीडीत होती. व्यक्तीने सांगितलं की, लग्नाच्या 9 महिन्यात म्हणजे साधारण 17 फेब्रुवारी 2006 नंतर ती आई-वडिलांकडेच राहत आहे.
मेडिकल टेस्टसाठी नकार..
महिलेवे दावा केला आहे की, तिला मानसिक वा शारीरिक आजार नाही. कोर्टाने तिला मेडिकल बोर्डाकडून तपास करण्यास सांगितलं होतं. मात्र महिलेने मेडिकल टेस्ट करण्यास नकार दिला. यानंतर न्यायालयाने सांगितलं की, दोघेही 9 आठवड्यांहून अधिक काळापासून एकत्र राहत नाही. त्यामुळे काहीतरी आजार असल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा-
कोर्टाने सुनावली 190 वर्षांची शिक्षा, जिवंत जळाले होते 22 प्रवासी
डोकेदुखी आजाराचं लक्षण..
खंडपीठाने सांगितलं की, डोकेदुखी हा कोणताही आजार नाही, तर आजाराचं लक्षण आहे. मात्र वारंवार डोकेदुखीचं कारण मात्र महिलेने सांगितलं नाही. यामुळे महिलेला आपलं शिक्षणही सोडावं लागलं होतं. खंडपीठाने सांगितलं की, मानसिक आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या मुलांवरही याचा परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.