मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, नंतर भावाची हत्या करून मृतदेह गावात लटकवला; देशातील संतापजनक घटना

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, नंतर भावाची हत्या करून मृतदेह गावात लटकवला; देशातील संतापजनक घटना

शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

देशात दररोज बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. यासह आरोपींची ही मुजोरी चिंता वाढवणारी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 23 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गँगरेप पीडितेच्या भावाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आहार पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे आधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. जेव्हा पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीसोबत प्रकरण सोडवण्यास नकार दिला तर मुलीच्या भावाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला.

या प्रकरणात पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आधी एका आरोपीला अटक करण्यात आली. यानंतर दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान 20 ऑगस्ट कोजी आरोपी पक्षाच्या 5 जणांनी गावातील सरपंचासोबत पीडितेच्या भावाला बोलावलं आणि त्याला प्रकरण मिटवण्यास सांगितलं. पीडितेच्या भावाने यास नकार दिला आणि तेथून निघून गेला.

मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढून नेत सामूहिक बलात्कार, पुणे जिल्ह्यातील संतापजनक घटना

बराच वेळ झाला तरी भाऊ घरी आला नाही त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला शोध सुरू केला. थोड्या वेळानंतर त्याचा मृतदेह गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. मृतदेहावर अनेक जखमाही आढळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भावाने जेव्हा प्रकरण मिटवण्यास नकार दिला तर त्याची हत्या करण्यात आली आणि मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. पीडितेच्या वडिलांनी मुलाच्या हत्या प्रकरणात गावाच्या सरपंचासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Crime news, Gang Rape