जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Facebook वरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य

Facebook वरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री (Friendship on Facebook) झाली. हा तरुण कोल्हापूर (Kolhapur) येथील आहे. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर ही मुलगी फेसबुक फ्रेंडला भेटायला थे कोल्हापुरला गेली.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 29 मे : सध्याची पिढी ही सोशल मीडियाच्या (Social Media) काळातील पिढी आहे. याच सोशल मिडियाचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम येथील तरुणांना भोगावे लागतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या घटना घडल्याचे तुम्ही वाचले असेल. फेसबुक (Facebook) वापरणाऱ्या अशाच एका मुलीसोबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं - बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री (Friendship on Facebook) झाली. हा तरुण कोल्हापूर (Kolhapur) येथील आहे. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर ही मुलगी फेसबुक फ्रेंडला भेटायला थेट कोल्हापुरला गेली. तेव्हा तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. या फेसबुक फ्रेंडने तिच्यावर अत्याचार (Physcial Abused by Facebook Friend) केला. ही धक्कादायक घटना 28 मेला समोर आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पीडित मुलगी आणि मुलगा हे दोन्ही कोल्हापुरात सापडले, अशी माहिती बीड पोलिसांना मिळाल्यावर पोलीस पथक 27मेला बीड येथे गेले. यांनतर त्या दोघांना घेऊन 28 मेला बीड येथे आणण्यात आले. यानंतर अपरहणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम वाढविण्यात आले आहे. माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव समद महंमद तहसीलदार असे आहे. त्याचे वय 19 असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या खेबळी येथील रहिवासी आहे. बीड येथील ग्रामीण ठाणे परिसरात राहणारी एक 16 वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी समद तहसीलदार नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात ही मुलगी इतकी वाहत गेली की ती 24 मेला घरातील कुणालाही न सांगता बीड येथून कोल्हापुरला गेली. हेही वाचा -  क्षुल्लक कारणावरुन पोटचा पोरगाच झाला वैरी, कुऱ्हाडीचे घाव घालत जन्मदात्या पित्याची केली हत्या

कोल्हापुरला गेल्यावर आग्रा येथे 25 मेला एका बंद स्थितीतील विश्रामगृहात या दोन्ही प्रेमीयुगुलाने मुक्काम केला. याचवेळी या अल्पवयीन मुलीवर आरोपी समदने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 26 तारखेला या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अधिक तपास पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात