मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तहसीलदाराला 1 लाख तर शिपायला 20 हजार, लाचखोरांची निघाली थेट पोलिसांच्या दारात वरात!

तहसीलदाराला 1 लाख तर शिपायला 20 हजार, लाचखोरांची निघाली थेट पोलिसांच्या दारात वरात!

तक्रारदार यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांचे कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका जमिनीबाबत सुनावणी सुरू होती.

तक्रारदार यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांचे कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका जमिनीबाबत सुनावणी सुरू होती.

तक्रारदार यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांचे कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका जमिनीबाबत सुनावणी सुरू होती.

कल्याण, 30 ऑगस्ट : कल्याणच्या तहसीलदारासह ( Kalyan Tehsildar arrested ) शिपायाला लाच  (bribe) घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने (anti corruption bureau thane) आज तहसील कार्यलयातच त्यांना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मारुतीराव आकडे असं लाचखोर तहसीलदाराचं नाव आहे. तर बाबु उर्फ मनोहर ‍दत्तात्रय हरड असं लाचखोर शिपायाचं नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तहसीलदार आणि शिपाई या दोघा लाचखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई लाचलुचपत विभागाच्या पथकानेकडून सुरू आहे.

तक्रारदार यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांचे कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका जमिनीबाबत सुनावणी सुरू होती. या दरम्यान लाचखोर तहसीलदार यांनी 26 ऑगस्ट रोजी शिपाई मनोहर मार्फत 1 लाख तहसीलदार आणि कार्यलयीन कामकाज करणाऱ्या कर्मचारीसाठी 20 हजार अशी एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रादाराने दिलेल्या लाचेच्या मागणीच्या तक्रारीची ठाणे लाचलुचपत पथकाने शहानिशाकरून आज 30 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तक्रादार हे लाचखोरांना 1 लाख 20 हजार रुपयांची लाच देण्यासाठी गेले असता. या दोघांनाही सापळा रचून ठाणे लाचलुचपत पथकाने तहसील कार्यलयातच लाच घेताना दोघा लाचखोरांना रंगेहात पकडले.

ठाणे लाचलुचपत पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस नाईक, प्रशांत घोलप, महिला पोलीस नाईक जयश्री पवार,  पोलीस शिफाई विनोद जाधव,  पद्माकर पारधी, या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. दरम्यान तहसीलदार सारख्या एवढ्या मोठ्या अधिकार्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने यानिमित्ताने महसूल विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे काहींनी मात्र या अटकेनंतर कारवाईबाबत समाधान व्यक्त केल्याची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.

First published:

Tags: Kalyan, Tahsildar