जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोठी बातमी! बिहारमध्ये हिंसाचार घडवण्याचं मोठं षडयंत्र? IB कडून अलर्ट जारी

मोठी बातमी! बिहारमध्ये हिंसाचार घडवण्याचं मोठं षडयंत्र? IB कडून अलर्ट जारी

मोठी बातमी! बिहारमध्ये हिंसाचार घडवण्याचं मोठं षडयंत्र? IB कडून अलर्ट जारी

इंटेलिजेन्स ब्यूरो अर्थात आयबीने बिहारमध्ये अलर्ट जारी केला आहे. कारण काही असामाजिक घटकांकडून शुक्रवारी होणाऱ्या नमाज पठणानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

  • -MIN READ Bihar Sharif,Nalanda,Bihar
  • Last Updated :

पाटणा, 23 जुलै : बिहारची राजधानी पाटणाच्या फुलवारी शरीफ या परिसरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयित कारस्थानाचा उलगडा झाला होता. याप्रकरणी तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे इंटेलिजेन्स ब्यूरो अर्थात आयबीने बिहारमध्ये अलर्ट जारी केला आहे. कारण काही असामाजिक घटकांकडून शुक्रवारी होणाऱ्या नमाज पठणानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पीएफआय आणि इतर काही कट्टरपंथी विचारधारेचे संघटक शुक्रवारी होणाऱ्या नमाज पठणात सहभागी होतील आणि ते गर्दीतील नागरिकांचे माथी भडकवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा तोच उद्देश आहे. त्यामुळे आयबीने पूर्ण बिहारमध्ये अलर्ट जारी केला आहे. विशेषत: उत्तर बिहारमधील मुजफ्फरपूर, सीतामढी, दरभंगा, पूर्णिमा, कटिहार, किशनगंज, अररिया यांसह आणखी काही जिल्ह्यांमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आलं आहे. या भागांमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टमध्ये आहे. कारण या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी नमाज पठणादरम्यान मोठा जनसागर एकत्र येतो. या दरम्यान काही विपरीत घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. ( सोन्याचा कॉईन, 70 किलो सोनं, आणि बिल्डरच्या भोवती आमिषाचा फास, भामट्यांचा 3 कोटींच्या गेमचा महाराष्ट्र पोलिसांकडून दी एन्ड )

 आयबीने दिलेल्या माहितीनुसार, तणाव निर्माण करण्यासाठी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा आधार घेतला जावू शकतो. विशेष म्हणजे सीतामढी येथे अशीच एक घटना घडली देखील आहे. सीतामढीमध्ये एका समुदायाच्या काही लोकांनी एकत्र येवून अंकित कुमार झा नावाच्या युवकावर भर बाजारात चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. घटनेनंतर संबंधित प्रकरणाशी संबंधित आणखी काही माहिती समोर आली होती.

या व्यतिरिक्त पोलीस मुख्यालयाने अग्निवीर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देखील अलर्ट जारी केला आहे. राजधानी पाटणा पासून सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान कुणी त्याला विरोध करु नये किंवा परीक्षा देणाऱ्यांना त्रास दिला जावू नये यासाठी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत तरी एकाही जिल्ह्यातून कोणत्याही विपरीत घटनेची माहिती समोर आलेली नाही. पण पोलिसांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात