जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! प्रेमात एवढी आंंधळी झाली महिला की नवरा-मुलांना सोडून बनली 'लेडी डॉन'

धक्कादायक! प्रेमात एवढी आंंधळी झाली महिला की नवरा-मुलांना सोडून बनली 'लेडी डॉन'

धक्कादायक! प्रेमात एवढी आंंधळी झाली महिला की नवरा-मुलांना सोडून बनली 'लेडी डॉन'

बिहारमधल्या (Bihar News) पाटणा इथलं एक प्रेमप्रकरण सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. पाटणा पोलिसांनी एका विवाहित महिलेला अटक केली असून, ही महिला तिचा पती आणि मुलांना सोडून एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. आपल्या प्रेमासाठी ती लेडी डॉनही बनली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    पाटणा, 12 मार्च: प्रेमप्रकरण (Love affair) हा तसा प्रत्येकाचा खासगी विषय असतो; पण प्रेमप्रकरणांत गुन्ह्याचा शिरकाव झाला की ते चर्चेचा विषय बनतात. बिहारमधल्या (Bihar News) पाटणा इथलं एक प्रेमप्रकरण सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. पाटणा पोलिसांनी एका विवाहित महिलेला अटक केली असून, ही महिला तिचा पती आणि मुलांना सोडून एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. आपल्या प्रेमासाठी ती लेडी डॉनही  (Woman become Lady Don for love) बनली. प्रियकराच्या सांगण्यावरून गुन्हेगारी कृत्यात सहभागी होणाऱ्या या लेडी डॉनला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या महिलेची प्रेमकहाणी सध्या विशेष चर्चेत आहे. ‘प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं,’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. सध्या पाटण्यामधली अशीच एक प्रेमकहाणी चर्चेत आहे. नगमा (Nagma) नावाच्या महिलेनं प्रेमासाठी तिचा पती आणि मुलांना सोडून दिलं. त्यानंतर ती तिचा प्रियकर राहुलसोबत पळून गेली. प्रियकराच्या सांगण्यावरून गुन्हेगारी कृत्यं करू लागली; पण पोलिसांनी या लेडी डॉनला अटक केली. नगमा आणि राहुल यांची प्रेमकहाणी रंजक आहे. राहुल आणि नगमा यांचे प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न केलं. नगमा विवाहित असून तिला एक मुलगा असल्याचं सुरुवातीला राहुलला माहीत नव्हतं. नगमाला पळवून आणल्यानंतर राहुलने तिला गायघाट परिसरात एका भाड्याच्या घरात ठेवलं होतं. एक महिन्यापूर्वी राहुलला जामीन मिळाला आणि तुरुंगातून बाहेर येताच त्याने नगमाशी लग्न केलं होतं, असं पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आलं. हे वाचा- ‘सॉरी बाबा, जे वाचतो ते विसरून जातो’; नववीच्या विद्यार्थ्याने स्वत:लाच संपवलं! जेलमध्ये कैद राहुलचं काम सांभाळायची नगमा राहुल हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पाटण्यामधल्या चितकोहरा इथला रहिवासी आहे. तो सुपारी घेत असे, तसंच शस्त्रास्त्रांची तस्करीही (Arms smuggling) करत होता. 2015 मध्ये विक्रम नावाच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात तो सुमारे 5 वर्षं छपरा कारागृहात होता. दरम्यान, टोळीची सूत्रं नगमा सांभाळत होती. तुरुंगात असलेल्या राहुलशी ती सातत्याने संपर्कात होती. तसंच त्याच्या सांगण्यावरून शस्त्रपुरवठादेखील करत होती. हे वाचा- भयंकर! सपा नेत्यासह पत्नीची क्रूरपणे हत्या; घरातच पुरले मृतदेह सीसीटीव्हीमुळे झाला खुलासा काही दिवसांपूर्वी पाटण्यातल्या गर्दनीबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या अनिशाबादमधल्या एका मोबाइल शॉपीवर दरोडा टाकण्याच्या उद्देशानं गुंडांनी गोळीबार केला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. तपासाअंती पोलिसांनी राहुल आणि नगमाला अटक केली. चौकशीदरम्यान राहुलने सांगितलं की ‘मला सोनू नावाच्या व्यक्तीनं या मोबाइल शॉपीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. हत्या करण्याच्या उद्देशानं आम्ही दुकानात गोळीबार केला आणि त्या युवकाची गोळी झाडून हत्या केली’. या गुन्ह्यासोबतच या लेडी डॉनची प्रेमकहाणी जोरदार चर्चेत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात