जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'सॉरी बाबा, जे वाचतो ते विसरून जातो'; नववीच्या विद्यार्थ्याने स्वत:लाच संपवलं!

'सॉरी बाबा, जे वाचतो ते विसरून जातो'; नववीच्या विद्यार्थ्याने स्वत:लाच संपवलं!

'सॉरी बाबा, जे वाचतो ते विसरून जातो'; नववीच्या विद्यार्थ्याने स्वत:लाच संपवलं!

विद्यार्थ्याने सुसाइड नोटमध्ये वडिलांना एक मार्मिक पत्र लिहिलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 12 मार्च : बुरहानपुर जिल्ह्यातील नेपानगरमध्ये एका नववीच्या विद्यार्थ्याने आदिवासी मुलांच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याने सुसाइड नोटमध्ये वडिलांना एक मार्मिक पत्र लिहिलं. ज्याची सुरुवात लव्ह यू पापा पासून केली आहे. पुढे तो लिहितो की, मी जो काही वाचतो, अभ्यास करतो ते सर्व विसरून जातो. त्यामुळे मी वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या इच्छेने आत्महत्या करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळी नेपानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. येथे नववीतील मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्याच्या खोलीचा तपास केल्यानंतर एक सुसाइड नोट सापडली. विसरभोळेपणामुळे बाबांचं स्वप्न पूर्ण करता न येण्याचं दु:ख अल्पवयीन मुलाने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, त्याला विसरण्याचा आजार होता. ज्यामुळे तो अभ्यास करीत असला तरी विसरून जात होता. यामुळे तो आपल्या आई-वडिलांचं स्पप्न पूर्ण करू शकत नव्हता. आणि त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं. त्याने सुसाइड नोट लिहिल्यानंतर रात्रीच गळफास घेतला. सकाळी अन्य विद्यार्थ्यांनी त्याला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर शिक्षकांना सांगितलं. हे ही वाचा- आमदाराने निवडणुकीसाठी जमलेल्यांना कारने चिरडलं; तब्बल 23 जणं जबर जखमी लव्ह यू बाबा…तुमच्यासारखे बाबा मला मिळाले.. अल्पवयीन मुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइट नोटमधून महत्त्वाची बाब समोर आली आहे. त्याचं वडिलांवर खूप प्रेम होतं. तुमच्यासारखे बाबा मला लाभले हे माझं भाग्य असल्याचंही त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. तुमचा मुलगा हा तुमची स्वप्न पूर्ण करणारा असायला हवा होता. मात्र मी काही करू शकत नाही. मला माफ करा…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात