मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलगी पुन्हा जिवंत होण्याच्या आशेन आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य; 2 महिने घरातच ठेवला मृतदेह अन्..

मुलगी पुन्हा जिवंत होण्याच्या आशेन आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य; 2 महिने घरातच ठेवला मृतदेह अन्..

आपल्या मुलीचं खरंच निधन झालं आहे, या गोष्टीवर या कपलचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला, की त्यांची मुलगी आता या जगात नाही

आपल्या मुलीचं खरंच निधन झालं आहे, या गोष्टीवर या कपलचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला, की त्यांची मुलगी आता या जगात नाही

आपल्या मुलीचं खरंच निधन झालं आहे, या गोष्टीवर या कपलचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला, की त्यांची मुलगी आता या जगात नाही

नवी दिल्ली 14 जानेवारी : आई-वडिलांसाठी त्यांची मुलं सर्वात महत्त्वाची असतात. आपल्या मुलांसाठी पालक काहीही करायला तयार असतात. अशात आपल्या मुलांना गमावणं, त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच असतं. इंडोनेशियामधील एका कपललाही आपल्या मुलीला गमवण्याचं दुःख सहन करावं लागलं. मात्र, यानंतर कपलने जे काही केलं, ते धक्कादायक होतं. या जोडप्याने आपल्या मुलीचा मृतदेह या आशेवर दोन महिने घरातच ठेवला (Parents Kept Dead Body of Daughter For 2 Months in House), की ती पुन्हा जिवंत होईल.

खोकल्याचं औषध घेऊन झोपी गेलं दाम्पत्य; काही तासात महिलेचा मृत्यू, गावात खळबळ

आपल्या मुलीचं खरंच निधन झालं आहे, या गोष्टीवर या कपलचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला, की त्यांची मुलगी आता या जगात नाही. यानंतर कपलने दोन महिने मुलीचा मृतदेह घरातच ठेवला. त्यांना अशी आशा होती, की त्यांची मुलगी पुन्हा जिवंत होईल. मात्र, दोन महिन्यांनंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरू लागली. यानंतर शेजाऱ्यांनी चौकशी सुरू केल्यावर हे प्रकरण समोर आलं आणि मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ही घटना इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा येथील पलकरन गावातील आहे. घरातून भरपूर दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी घरात जात तपासणी कऱण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना घरात दोन महिन्यांपासून पडून असलेला सडलेला मृतदेह दिसला. या घटनेत 14 वर्षीय मुलीचा टीबीमुळे मृत्यू झाला होता, मात्र तिच्या आई-वडिलांना यावर विश्वास बसत नव्हता की त्यांची मुलगी आता या जगात नाही. त्यांना अशी आशा होती, की त्यांची मुलगी पुन्हा जिवंत होईल.

वयाच्या 40 व्या वर्षी नसबंदी केलेल्या महिलेसोबत लावलं लग्न; नवरदेवाचा चढला पारा

जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा माहिती मिळाली की मुलीच्या आई-वडिलांनी तिला जिवंत करण्यासाठी हवनही केलं होतं. गावातील लोकांनी या मुलीच्या आई-वडिलांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भरपूर वेळ समजावलं. मात्र, ते ऐकायला तयार नव्हते. अखेर घराच्या जवळच असलेल्या कबरीमध्ये आपल्या मुलीचा मृतदेह दफन करायला ते तयार झाले.

First published:

Tags: Dead body, Shocking news