जयपूर, 13 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) बारनेरमध्ये 40 वर्षीय तरुणाने दलालांना 3 लाख रुपये देऊन दोन मुलं असलेल्या महिलेसोबत लग्न केलं. लग्नानंतर नवरीने पंजाबमध्ये जाण्यास जबरदस्ती करू लागली. मात्र सासरच्या मंडळींनी यास नकार दिला. यावर रागावलेल्या महिलेने आपली सत्यकथा कथन केली. महिलेकडून खरं ऐकताच नवरदेवाला धक्का (Crime News) बसला. ही महिला दलालांसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. शेवटी नवरदेवाच्या सूचनेनंतर पोलिसांनी बुधवारी नवरीसह दलालांना अटक केली.
ही घटना बाडमेरमधील रामदेरिया काश्मीर गावातील आहे. पीडित नवरदेवाने सांगितलं की, पंजाबमधील जसवंद सिंग आणि सोनू यांची लग्नासाठी भेट घेतली होती. त्यांनी 3 लाख रुपये घेऊन लग्नाचं वचन दिलं. पंजाबमधील एका महिलेसोबत येथील एका मंदिरात त्यांनी लग्न लावून दिलं. पीडित नवरदेवाने सांगितलं की, लग्नाच्या 12 दिवसांपर्यंत सर्वकाही ठीक सुरू होतं. यानंतर नवरी पंजाबला जाण्यासाठी जबरदस्ती करू लागली. सासरच्या मंडळींनी यास नकार दिला, तर तिने सर्व सत्य कथन केलं. तिमे सांगितलं की, आधीच ती विवाहित असून तिला दोन मुलंदेखील आहे.
हे ही वाचा-खाली पाडत नाक दाबून तोंडात ओतलं विष, निवृत्त पोलिसासोबत सुनेचं अमानुष कृत्य
याशिवाय मुलांनंतर तिने नसबंदी केली आहे. हे ऐकताच सासरच्या मंडळींना जबर धक्का बसला. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं नवरदेवाच्या लक्षात आलं. दोन दिवसांपूर्वी हे दलाल नवरीला घेऊन जाण्यासाठी लपूनछपून आले होते. हे नवरदेवाच्या लक्षात आलं. त्याने पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी महिलेसह दोन्ही दलालांनाही ताब्यात घेतलं. महिलेचं आधीच लग्न झालं असून तिचा पहिला पती पंजाबमध्ये ट्रक ड्रायव्हर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Marriage, Rajasthan