मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लॉरेन्स बिश्नोई ते हाशिम बाबा 'हे' आहेत भारतातील टॉप 10 गँगस्टर

लॉरेन्स बिश्नोई ते हाशिम बाबा 'हे' आहेत भारतातील टॉप 10 गँगस्टर

देशातील टॉप टेन गँगस्टर

देशातील टॉप टेन गँगस्टर

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असतानाही त्याची दहशत काही कमी झालेली नाही. आज आपण अशाच देशातील टॉप दहा गँगस्टरची माहिती घेणार आहोत जे तुरुंगात असताना देखील त्यांची दहशत कायम आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  दिल्ली, 24 मार्च: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असतानाही त्याची दहशत काही कमी झालेली नाही. बिश्नोईनं नुकत्याच दिलेल्या एका मुलखातीत अनेक धक्कादायक खुलासे केलेत; पण तुम्हाला माहिती आहे का तुरुंगात असतानाही दहशत कायम ठेवणाऱ्यांमध्ये बिश्नोई याचेच नाव येत नाहीत. तर, गुन्हेगारी विश्वात असे काही गँगस्टर आहेत, जे तुरुंगात असतानाही त्यांची दहशत अद्यापही कायम आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 गुन्हेगारांची माहिती देणार आहोत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.

  दिल्ली व या शहराच्या जवळील राज्यांमध्ये असे अनेक गुन्हेगार आहेत, जे पोलीस आणि विविध सरकारी यंत्रणांना त्रासदायक ठरलेत. या गुन्हेगारांचं नुसतं नाव घेतलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 गुन्हेगारांबद्दल सांगणार आहोत, जे तुरुंगामध्ये असतील किंवा बाहेर असतील, पण त्यांची दहशत कधीच कमी झालेली नाही. यातील अनेक गुन्हेगार आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाईसुद्धा झाली आहे.

  हाशिम बाबा

  असीम असं या गँगस्टरचं खरं नाव आहे. हा गँगस्टर दिल्लीत असतो. दरोडा, खून आणि खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड गँगस्टर असणाऱ्या हाशिमला 12 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या एका चकमकीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली होती. दिल्लीच्या या टॉप मोस्ट गँगस्टरची कहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. सर्वप्रथम त्यानं जुगाराचा धंदा सुरू केला होता. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि दाऊद इब्राहिमसारखा मोठा डॉन बनायचं त्याचं स्वप्न होतं.

  मनजित महल

  गँगस्टर मनजित महलची दहशत हरिणामध्ये खूपच होती. 2017 मध्ये गुडगावच्या भोंडसी कारागृहात असताना महल यानं तेथूनच सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वजिराबादमधील कोट्यवधींची जमीन खाली करण्याची धमकी दिली होती. तपासात पुढं आलं की, एस्कॉर्ट गार्डमध्ये तैनात एएसआय राज सिंह यांनी राकेश नावाच्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यास महलला सांगितलं होतं. मनजित महलच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आजही त्याच्या गँगमधील लोक त्याचं नाव घेऊन लोकांना धमकावतात.

  काला राणा

  हरियाणातील यमुना नगरमधील हा गँगस्टर रहिवासी आहे. 2021 मध्ये एनआयए आणि एसटीएफने ज्यांना पकडण्यासाठी छापेमारी केली होती, अशा गुन्हेगारांच्या यादीत काला राणाचं नाव समाविष्ट आहे. 2021 मध्येच काला राणाला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं थायलंडमधून भारतात आणलं. यानंतर हरियाणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. राणा काला जाठेडी टोळीशी संबंधित आहे.

  टिल्लू ताजपुरिया

  हा गँगस्टर आउटर दिल्ली आणि हरियाणामध्ये गुन्हेगारी विश्वात कार्यरत असतो. टिल्लू ताजपुरिया हा तोच गँगस्टर आहे, ज्याने मंडोली कारागृहात असताना, 24 सप्टेंबर 2021 रोजी रोहिणी न्यायालयात दोन शूटरला पाठवून कुख्यात गुंड जितेंद्र गोगीचा खून केला होता. या वेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचे दोन्ही शूटर मारले गेले होते. टिल्लूनं त्याचा साथीदार पवनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गोगीचा खून केला होता.

  जितेंद्र गोगी

  2021 पर्यंत गँगस्टर जितेंद्र गोगीची टोळी लोणी, आउटर दिल्ली आणि हरियाणामध्ये कार्यरत होती. पण 24 सप्टेंबर 2021 रोजी टिल्लू ताजपुरियाच्या दोन शुटरनं जितेंद्र गोगीची रोहिणी न्यायालयाच्या परिसरात हत्या केली. जितेंद्र गोगी हा दिल्लीतील अलीपूर गावाचा रहिवासी होता. त्यानं 15 हून अधिक गंभीर गुन्हे केले होते. गोगी यानं 2009 मध्ये गुन्हेगारी जगतात प्रवेश केला होता. गोगी हा मारला गेला असला तरीही त्याची टोळी आजही सक्रिय असल्याचं बोललं जातं.

  दविंदर बंबीहा

  ही टोळी पंजाब आणि आर्मेनियामध्ये कार्यरत आहे. ज्याचा मास्टरमाईंड दविंदर बंबीहा आहे. त्याच खरं नाव दविंदरसिंग सिद्धू होतं. मोगा जिल्ह्यातील बंबीहा गावात त्याचा जन्म झाला. गुन्हेगारीच्या जगात येण्यापूर्वी तो लोकप्रिय कबड्डीपटू होता. 2010 मध्ये तो कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना एका खुनाच्या प्रकरणात त्याच नाव समोर आलं. यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात असताना तो अनेक गुंडांच्या संपर्कात आला आणि नंतर तो शार्प शूटर बनला.

  लॉरेन्स बिश्नोई

  कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे नाव गुन्हेगारीच्या विश्वात नवीन नाही. तुरुंगात असतानाही तो त्याची गँग चालवतो, असं बोललं जातं. बिश्नोईवर सलमान खानवर हल्ला करण्याचा दोनदा कट रचण, परदेशातून शस्त्रं मागवणं आणि सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या गँगस्टरची गँग पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये सक्रिय आहे. त्याची गँग कॅनडा आणि दुबईतून चालवली जाते.

  गोल्डी बराड

  गँगस्टर गोल्डी बराडचं खरं नाव सतींदरजीत सिंह बराड आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा मानला जातो. पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यात युवक काँग्रेसचे नेते गुरलाल सिंह पहलवान यांच्या हत्येप्रकरणी त्याचं नाव समोर आलंय. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात गोल्डीही आरोपी आहे. 2021 मध्ये त्याच्याविरुद्ध पंजाबमधून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होते. पोलीस गोल्डीचा 16 हून अधिक प्रकरणांमध्ये शोध घेत आहेत.

  नीरज बवानिया

  हा गँगस्टर नजफगढ म्हणजेच आउटर दिल्लीत एक टोळी चालवतो. सुमारे 17 वर्षांपूर्वी नीरज बवानानं गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला होता. नीरज हा दिल्लीतील बवाना गावचा रहिवासी आहे. तो आपल्या आडनावाच्या जागी आपल्या गावाचं नाव लावतो. खून, दरोडा, जीवे मारण्याच्या धमक्या यांसारखे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दिल्ली आणि इतर राज्यांत दाखल आहेत. नीरज सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.

  काला जठेडी

  संदीप उर्फ काला उर्फ काला जठेडी हा गँगस्टर हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि मुंबईत गुन्हेगारी करतो. दिल्लीतील सागर धनखड हत्या प्रकरणानंतर याच नाव चर्चेत आलं होतं. कुस्तीपटू सागर धनखड हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेला सोनू महाल हा काला जठेडीचा नातेवाईक आहे. काला जठेडीची माहिती देणाऱ्याला सात लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. कुस्तीपटू सुशील कुमारनं सुद्धा स्वतःच्या जीवाला या गँगस्टरपासून धोका असल्याचं म्हटलं होतं.

  First published:
  top videos

   Tags: Delhi, Gangster, Police