जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कॉलेजमधील महिला प्राध्यापकाच्या SBI खात्यातून 33 लाख गायब; 12 वी पास विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रताप

कॉलेजमधील महिला प्राध्यापकाच्या SBI खात्यातून 33 लाख गायब; 12 वी पास विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रताप

कॉलेजमधील महिला प्राध्यापकाच्या SBI खात्यातून 33 लाख गायब; 12 वी पास विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रताप

KYC अपडेट करून देत असल्याच्या नावाखाली आरोपीने ही फसवणूक केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 4 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमधील एका सरकारी कॉलेजच्या माजी महिला प्राध्यापकासोबत फसवणुकीचा (Money Fraud) प्रकार समोर आला आहे. बँकेतील KYC अपडेट करण्याचं कारण सांगून महिलेच्या बँकेतून तब्बल 33 लाख रुपये चोरी करण्यात आले. महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. इंदूरमधील कन्या महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापक यांना झारखंडमधील धनबादमध्ये राहणाऱ्या हरीश दास याने बँक खात्याचा KYC अपडेट करण्याच्या नावाखाली मेसेज पाठला होता. यानंतर त्यांच्या खात्याची संपूर्ण डिटेल्स विचारून बँक खात्याचं नेट बँकिंगची लॉग इन आयडी तयार केली. मोबाइल फोनचा नंबर बदलला आणि खात्यातून तब्बल 33 लाख रुपये काढले. बँक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज प्राध्यापकांना आला नव्हता. अनेक दिवसांनी जेव्हा त्या बँकेत गेल्यात तर खात्यात पैसे नसल्याचं कळालं. यानंतर त्यांनी क्राइम ब्रान्चकडे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. सायबर सेल एसपी जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणात झारखंडमधील धनबादचा हरीश दासने गुन्हा केल्याचं समोर आलं. आरोपीने सांगितलं की, YONO अॅपच्या साहाय्याने त्याला प्रोफेसरच्या एफडीबद्दल कळालं होतं. यावर त्यावर लोक घेऊन पेटीएम वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर केले होते. 12 वी पास आरोपीकडून पोलिसांनी चार सिम, दोन मोबाइल आणि 3 लाख 50 हजार रुपये जप्त केले. हे ही वाचा- Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री पडली महाग! ‘मैत्रिणी’नं घातला 8 लाखांचा गंडा आरोपी बीएसएनएल कंपनीचे मोबाइल नंबरची एक सीरिज घेऊन लोकांना एकत्रित बनावटी मोबाइल नंबरांवरुन एसबीआय बँक खात्याचा KYC अपडेट करण्यासाठी एकत्रित मेसेज करीत होते. ज्यात लिहिलं होतं की, KYC अपडेट न केल्यास आपलं बँक खातं बंद करण्यात येईल. अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकाशी संपर्क करा. मेसेज वाचून काही जण मोबाइलवर संपर्क करीत होते. ज्यात ती KYC अपडेट करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्डाचे डिटेल्स मागत. यानंतर ते लोकांना बोलण्यात गुंगवून मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी विचारून इंटरनेट बँकिंग लॉग इन आयडी पासवर्ड तयार करीत. नागरिकांनी काय काळजी घ्यावी… -मोबाइल नंबरवरुन KYC अपडेट करण्याच्या नावाखाली आलेल्या टेक्स मेसेजकडे दुर्लक्ष करा. -बँकेबाबत कोणतीही माहिती स्वत: बँकेत जाऊन मिळवा. -मोबाइल नंबरवर आलेले ओटीपी अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. -अनोळखी व्यक्तीच्या कॉलवर विश्वास ठेवू नका. तिला बँकेसंबंधित वा आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती देऊ नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात