Home /News /maharashtra /

सावकरांची दहशत आजही कायम; सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, यवतमाळ जिल्ह्यातील घटना

सावकरांची दहशत आजही कायम; सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, यवतमाळ जिल्ह्यातील घटना

दोन जणांनी एका निराधार वृद्ध महिलेच्या घरात शिरून अमानुष कृत्य केलं आहे.

दोन जणांनी एका निराधार वृद्ध महिलेच्या घरात शिरून अमानुष कृत्य केलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील व्यावसायिकाने सावकराच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवले.

यवतमाळ, 31 ऑगस्ट : मार्च 2020 मध्ये कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला. त्याचा फटका व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले. खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहे. अशीच एक घटना यवतमाळ (Yavatmal) शहरातील वडगाव परिसरात घडली आहे. एका मॉड्युलर फर्निचर व्यावसायिकाने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Businessman suicide) करून जीवन यात्रा संपविली. तुषार माणिकराव साठवणे असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. त्याने वडगाव परिसरात मॉड्युलर फर्निचरचा व्यवसाय केला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे दुकान पुर्णतः बंद होते. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडण्यासाठी तुषार यांनी खाजगी सावकार ताटी पलूमवार यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तहसीलदाराला 1 लाख तर शिपायला 20 हजार, लाचखोरांची निघाली थेट पोलिसांच्या दारात वरात! व्यवसाय पूर्ववत सुरू झाला की कर्जाची परत फेड करू अस तुषार यांनी सांगितलं होतं. परंतु कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात आला. सावकाराकडून अपमानस्पद वागणूक देण्यात होती, त्यातच दुकानाची आवक बंद असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे ही कठीण झाले होते. त्यामुळे हताश झालेल्या तुषार यांनी अखेर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 29 ऑगस्टला तुषारची पत्नी पूनम साठवणे हिने अवधुतवादी पोलिसांत सावकार पलूमवार विरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ताटी पलूमवार विरुद्ध गुन्हा दाखल केला. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या कमाईचा मार्ग बंद झाला. व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आले. त्यामुळे सामान्य नागरिकांना कर्जासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. हताश झालेल्या नागरिकांचा खाजगी सावकारांनी वाटेल तसा गैरफायदा घेतला. कित्येकांच्या मालमत्ता हडप केल्या मात्र सावकारांच्या दादागिरी मुळे तक्रार देण्यास सामान्य माणूस पुढे येत नाही, त्यातच सावकाराचे पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांशी असलेलय हित संबंध या मुळे सावकाराचे कोणी काही करू शकत नाही. सावकारांनी दादागिरी अशीच सुरू राहील तर तुषार सारख्या अनेकांना आपला जीव गमावून बसण्याची वेळ येणार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Suicide, Yavatmal

पुढील बातम्या