मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाशिम : लग्नाचे आमिष देत गावातील तरुणाने दोन महिने ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेसोबत धक्कादायक प्रकार

वाशिम : लग्नाचे आमिष देत गावातील तरुणाने दोन महिने ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेसोबत धक्कादायक प्रकार

या महिलेची गावातीलच दुध विकणाऱ्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली.

या महिलेची गावातीलच दुध विकणाऱ्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली.

या महिलेची गावातीलच दुध विकणाऱ्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Washim, India
  • Published by:  News18 Desk

वाशिम, 25 सप्टेंबर : राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे चित्र आहे. यातूनच आता वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष देत दोन महिने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, यानंतर लग्नाला नकार देत महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन मानोरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

याप्रकरणी माहुली येथील पीडित महिलेने तक्रार दिली. तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2007मध्ये तिचे लग्न श्रीकांत रेवा राठोड यांच्याशी झाले होते. मात्र, दोन महिने संसार केल्यानंतर काही कारणामुळे पटले नाही म्हणून ही महिला माहेरी वडिलांच्या घरी परत आली. याठिकाणी या महिलेची गावातीलच देवश्री उत्तम चव्हाण या दुध विकणाऱ्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली.

त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. दरम्यान, त्याने या पीडित महिलेसोबत लग्न करण्याबाबत सांगितले. तर या महिलेनेही लग्नाला होकार दिला होता. यानंतर 12 जुलै 2022 रोजी दोन्ही जण पुण्याला गेले होते. त्यांनी तिथेच लग्न करुन राहायचे ठरवले. तिथे ते दोन महिने राहिले. या दोन महिन्यांदरम्यान, आरोपीने या महिलेसोबत राहून शारीरिक  संबंध ठेवले. दोन महिने त्याने या महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले मात्र, लग्नाला नकार देत लग्न केले नाही.

त्यामुळे पुणे येथून ही महिला घरी परत आली. यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडितेने मानोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी देवश्री चव्हाण याच्यावर भादंविचे कलम 376 (2) एन., 417, 324 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - वाशिममध्ये संतापजनक प्रकार, 60 वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध ठेवून महिलेची फसवणूक केल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Washim