जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुणे : बदलीसाठी पैशाची मागणी, सावकाराकडून काढले कर्ज, नंतर जाचाला कंटाळून लेखाधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल

पुणे : बदलीसाठी पैशाची मागणी, सावकाराकडून काढले कर्ज, नंतर जाचाला कंटाळून लेखाधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल

पुणे : बदलीसाठी पैशाची मागणी, सावकाराकडून काढले कर्ज, नंतर जाचाला कंटाळून लेखाधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल

गणेश शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात लेखाधिकारी होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 20 सप्टेंबर : राज्यासह पुण्यातही आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पुण्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. पुण्यातूनआणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेश शंकर शिंदे (वय 52), असे मृताचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - गणेश शंकर शिंदे यांना पुण्याला बदली हवी होती. या बदलीसाठी त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी पैसे मागितले होते. ते पैसे देण्यासाठी सावकारांकडून त्यांनी 30 टक्के व्याजदराने तब्बल 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर पैशांसाठी सावरकरांनी तगादा लावला होता. त्याचबरोबर त्या अधिकाऱ्याच्या झालेल्या फसवणूकीमुळे सहकार विभागात लेखाधिकारी कार्यरत असलेल्या गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी घडली. याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामधील विजय सोनी, क्षीरसागर, साळुंखे आणि हाजरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात लेखाधिकारी होते. त्यांना यांनी मुंबईहून पुण्याला बदली हवी होती. बदलीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यानी आरोपी सावकारांकडून तब्बल 84 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी 20 ते 30 टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. या पैशासाठी आरोपींनी लेखाधिकारी गणेश शिंदे यांचा मानसिक व आर्थिक छळ सुरू केला होता. दरम्यान, पंधरकर नावाच्या व्यक्तीने शिंदेंना 1 कोटी रुपयांचे पीएल लॉन करून देण्याचे आश्वासन दिले होते. हेही वाचा -  पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती यासाठी शिंदे यांच्याकडून मोठी आर्थिक रक्कमही उकळण्यात आली. मात्र, ऐनवेळी लोन करून देण्यास नकार दिल्याने शिंदे यांना धक्का बसला होता. एककीडे आरोपी सावकरांच्या जाच आणि दुसरीकडे झालेली फसवणूक याप्रकाराला कंटाळून शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime news , loan , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात