मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पहिल्या पत्नीला सुखात पाहून तरुण दुखावला; सूड उगवण्यासाठी पतीने आखला प्लान

पहिल्या पत्नीला सुखात पाहून तरुण दुखावला; सूड उगवण्यासाठी पतीने आखला प्लान

(Demo Pic- Pinterest)

(Demo Pic- Pinterest)

पहिल्या पत्नीचं सुख त्याला पाहावलं नाही आणि त्याने भयंकर पाऊल उचललं.

पाली, 12 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) पाली जिल्ह्यातील तखतगड पोलीस ठाणे हद्दीतील शनिवारी भरदिवसा एका महिलेचं तिच्या राहत्या घरातून अपहरण झालं. पोलिसांनी याप्रकरणात तपास सुरू केल्यानंतर नेमकी अडचण समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरलूट येथील निवासी मनोद कुमार प्रजापत याचं जालोर येथील एका महिलेसोबत लग्न झालं होतं. (man was hurt when he saw his first wife happy Husband plans to take revenge)

मात्र काही कारणामुळे महिलेने त्याला घटस्फोट देऊन तखतगड येथील दुसऱ्या तरुणासोबत लग्न केलं. यामुळे मनोज खूप संतापला होता. शनिवारी काही सहकाऱ्यांसोबत तखतगड येथे पहिल्या पत्नीच्या घरी पोहोचला. यावेळी महिला घरात एकटी होती. मात्र मनोजने तिला धमकी देत स्वत:सोबत गाडीत बसवून नेलं.

हे ही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

यानंतर पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी जालोर भागात नाकाबंदी केली. यावेळी मुलेगा गावात गाडी थांबवून महिलेला अपहरण कर्तांकडून मुक्त केलं. या प्रकरणात महिलेच्या पहिल्या पतीला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी पाहून गाडीतून उतरून आरोपी डोंगरांळ भागात पळून गेले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून मुख्य आरोपीसह दोन आरोपींना अटक केलं.

First published:
top videos

    Tags: Crime news, Rajasthan, Women safety