जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आधी आरोपीचं लग्न मग मृतदेहाची विल्हेवाट.. निक्कीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासे

आधी आरोपीचं लग्न मग मृतदेहाची विल्हेवाट.. निक्कीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासे

निक्की खून प्रकरणात धक्कादायक खुलासे

निक्की खून प्रकरणात धक्कादायक खुलासे

Delhi Nikki Yadav Murder Case: निक्की यादवच्या खून प्रकरणात एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : निक्की यादव हत्याकांडात अटक करण्यात आलेला आरोपी साहिल गेहलोत याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. साहिल सध्या क्राइम ब्रँचच्या ताब्यात आहे. त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणाबाबत रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने चौकशीदरम्यान सांगितले की, हत्येपूर्वी जेव्हा तो आणि निक्की कारमधून बाहेर पडले तेव्हा त्याच्या मनात हत्येचा कट सुरू होता. आधी निक्कीला गाडीतून ढकलून पाडायचं असा प्लॅन त्याने बनवला होता. त्यानंतर तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवता येईल. मात्र, हा प्लॅन यशस्वी होऊ शकलान नाही. मात्र, साहिलचा डाव सफल होऊ शकला नाही. दिल्लीच्या निगमबोध घाटावर निक्कीच्या हत्येची घटना त्याने घडवून आणली. साहिलच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याचे वडील, चुलत भाऊ आणि मित्रांनाही अटक केली आहे. वाचा - लैंगिक अत्याचारातील आरोपी मोकाट; पीडित महिलेने पोलिसांसमोरच..; बुलढाण्यात खळबळ साहिलच्या वडिलांना कसलाही पश्चाताप नाही दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलचे वडील बिरेंदर यांना कोणताही पश्चाताप नाही. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, साहिलचे वडील वीरेंद्र यांना या हत्येबद्दल काहीही वाटत नाही. साहिलचे वडील बिरेंद्र यांच्यावर यापूर्वीच गुन्हे शाखेत गुन्हा दाखल असून यात खुनाचाही गुन्हा आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्कीची हत्या करण्यापूर्वी वीरेंद्रला सर्व काही माहीत होते आणि त्याने या गुन्ह्यात साहिलला पूर्ण साथ दिली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा साहिलच्या वडिलांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांना निक्कीची हत्या करण्यात कोणताही पश्चाताप वाटत नव्हता.

News18लोकमत
News18लोकमत

त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांना कसे तरी निक्कीपासून सुटका मिळवायची होती. गुन्हे शाखेने साहिलच्या मावशीच्या मुलालाही अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता त्याच्यावर कांजवाला पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, साहिलने जेव्हा निक्कीची हत्या केली तेव्हा त्याने सर्वप्रथम त्याचा चुलत भाऊ नवीन याला हे सांगितले. त्यानंतर तो थेट त्याच्या ढाब्यावर पोहोचला होता. त्यानंतर सर्वांनी मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि लग्नानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: delhi , Murder
  • First Published :
जाहिरात
जाहिरात