जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / लैंगिक अत्याचारातील आरोपी मोकाट; पीडित महिलेने पोलिसांसमोरच..; बुलढाण्यातील प्रकाराने खळबळ

लैंगिक अत्याचारातील आरोपी मोकाट; पीडित महिलेने पोलिसांसमोरच..; बुलढाण्यातील प्रकाराने खळबळ

बुलढाण्यातील प्रकाराने खळबळ

बुलढाण्यातील प्रकाराने खळबळ

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित महिलेने विषारी रसायन घेतल्याने खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बुलढाणा, 19 फेब्रुवारी : महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण, त्यानंतर देखील महिलांचा छळ कमी झालेला नाही. या घटनांमध्ये अद्यापही कमतरता आलेली नाही. असंच काहीसं बुलढाणा जिल्ह्यातील एका विवाहित महिलेसोबत घडलं आहे. या विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार झाला आहे. मात्र, गुन्ह्यातील आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. न्याय न मिळाल्याने पीडित महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विषारी रसायन घेतले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? बुलढाणा जिल्ह्यातील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, त्यानंतरही आरोपींवर अटक करून कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास आत्महत्येचा इशारा या पीडित महिलेने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या महिलेने पोलिसांसमोर एडो सल्फान हा विषारी रसायन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच समय सूचकता दाखवत त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. वाचा - लग्नाला जाण्यापासून रोखल्यावर पत्नीने दिला जीव, पतीनेही उचलले भयानक पाऊल 6 लाखांसाठी नवविवाहितेला मारहाण शेगाव तालुक्यातील डोलारखेडची लेक सासरच्या मंडळींना असलेल्या पैशाच्या हव्यासाचा बळी ठरली. निकिता गणेश गावंडे वय वर्ष 21 राहणार जिल्हा अकोला असे सासरच्या लोकांच्या कौर्याचा बळी ठरलेल्या विवाहितेचे नाव आहे. निकिताचा भाऊ शुभमने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार निकिताचा विवाह 2022 च्या एप्रिल महिन्यात अकोला जिल्ह्यात झाला होता. येथील गणेश गावंडे याच्याशी निकिताचा विवाह झाला होता. निकिताला वडील नाही म्हणून निकिताच्या मोठ्या वडिलांनी तिचा विवाह लावून दिला होता. मात्र, लग्नानंतर निकिताच्या सासरकडील मंडळींनी तिला प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरुन 6 लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावण्यात आला होता. तिला सासरच्या मंडळीने शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. निकिताचा पती गणेश हा तिला पैशांच्या मागणीसाठी मारहाण करीत होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या निकिताच्या वाट्याला सुख आलेच नाही. अखेर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून 19 जानेवारीला तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिताचा भाऊ शुभमने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून निकिताच्या पती, सासू सासरे यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana , crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात