मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'नात्यामुळे लग्न करू शकलो नाही' म्हणत नवविवाहितेनं प्रियकरासोबत संपवलं आयुष्य, नांदेडमध्ये खळबळ

'नात्यामुळे लग्न करू शकलो नाही' म्हणत नवविवाहितेनं प्रियकरासोबत संपवलं आयुष्य, नांदेडमध्ये खळबळ

मृत तरुणीचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दिवाळी निमित्ताने ती माहेरी आली होती. मयत तरुण धनाजी आणि  तरुणी दोघेही नातलग होते.

मृत तरुणीचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दिवाळी निमित्ताने ती माहेरी आली होती. मयत तरुण धनाजी आणि तरुणी दोघेही नातलग होते.

मृत तरुणीचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दिवाळी निमित्ताने ती माहेरी आली होती. मयत तरुण धनाजी आणि तरुणी दोघेही नातलग होते.

नांदेड, 18 नोव्हेंबर : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून हिंगोलीला जाऊन एका जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज आणखी एका नवविवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराने आत्महत्या (committed suicide)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील  लोहा तालुक्यातील वाळकी गावात विहिरीत आज दोन मृतदेह आढळून आले होते. गावातील 24 वर्षीय अविवाहित धनाजी कोलते आणि एका नवविवाहित मुलीचे हे मृतदेह असल्याचे समोर आले. या दोघांनाही सोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ठाकरे सरकार गोंधळलेले, पाडण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही – चंद्रकांत पाटील मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दिवाळी निमित्ताने ती माहेरी आली होती. मयत तरुण धनाजी आणि  तरुणी दोघेही नातलग होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीचे लग्न झाल्यामुळे दोघांची ताटातूट झाली होती. दिवाळीच्या निमित्ताने गावी आल्यानंतर या तरुणीने धनाजीची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. शेतातील विहिरीतच दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी घटनेची माहिती उस्माननगर ग्रामीण पोलिसांना दिली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आहेत. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून अधिक तपासानंतर यावर भाष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. बायकोनेच माझ्या खुनाची सुपारी दिली - भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही जण जवळच्या नात्यातील होते. दोघांचं एकमेकावर प्रेम जडले होते. पण घरच्यांनी याची कुणकुण लागली होती. त्यामुळे दोनच महिन्यापूर्वी मुलीचे लग्न लावून दिले होते. आत्महत्येआधी एक सुसाईट नोट आढळून आली, यात 'आमच्या नात्याची आम्हाला जाणीव झाली आहे. या नात्यामुळे आम्ही लग्न करू शकलो नाही.  पण आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नाही, आम्हाला विरह सहन झाली, त्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत' असं मजकूर लिहून दोघांनी आत्महत्या केली.  एकाच नात्यातील दोघांनी आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Nanded, Suicide, नांदेड

पुढील बातम्या