सिलीगुड़ी, 31 मे : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी (Siliguri in West Bengal) स्थित नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एक व्यक्ती आयुष्यभरासाठी अपंग झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अपघातात वॉर्ड 20 मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की, ऑपरेशन करुन हा हात पुन्हा जोडता येऊ शकest तो. मात्र यानंतर कर्मचाऱ्यांनी कापलेला हात सांभाळून ठेवला नाही. रात्री उशिरा जेव्हा ऑपरेशनसाठी कापलेल्या हाताचा शोध सुरू केला तर समोर आलं की, एक कुत्रा रुग्णालयात शिरून हात घेऊन गेला होता. यानंतर लोकांनी कुत्र्याला हाताचा मांस खाताना पाहिलं. सोमवारी या घटनेबाबत माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या निष्काळजीपणाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात आंदोलन केलं. या प्रकरणात नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी समितीचं गठण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फूलबाडी जंक्शनवर टी-पार्कजवळ सिलीगुडी नगर पालिकेत राहणारा संजय याचा रस्ते अपघात झाला. या अपघातात त्याचा हात कोपऱ्यापासून कापला गेला. प्राथमिक उपचारा नंतर त्याचा हात एका बॅगेत पॅक करून ऑर्थोपॅडिक सर्जरी विभागात पाठवला. यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, हात पुन्हा जोडला जाऊ शकतो. रात्री उशिरा ऑपरेशनची तयारी करण्यात आली. रुग्णाला वॉर्डात दाखल केल्यानंतर अर्धवट कापलेल्या हात सापडत नव्हता. यानंतर शोध सुरू करण्यात आला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर गच्चीवर एक कुत्रा कापलेला हात चावताना दिसला. बरेच प्रयत्न करूनही कुत्र्याच्या तोंडातून हात घेता आला नाही. यानंतर सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या अधिक्षकांना घेरलं आणि आंदोलन केलं. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला कायमच अपंगत्व आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.