उल्हासनगर, 30 मे: भाजप आमदाराच्या गाडीवर (BJP MLA vehicle) एका अज्ञात तरुणाने हल्ला (stone pelted on MLA car) केला आहे. या अज्ञात तरुणाने आमदारांच्या उभ्या असलेल्या गाडीवर दगड मारून तिची काच फोडली आहे. उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांची ही गाडी आहे. या गाडीत त्याच्या मुलगा होता, मात्र ते यातून थोडक्यात बचावले. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात त्यांच्या मर्सिडीज गाडीचं नुकसान झालं.
उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे कुमार आयलानी हे आमदार आहेत. ते MH O5 DH 5555 ही मर्सडीज गाडी वापरतात. मात्र शनिवारी रात्री त्यांचा मुलगा धीरज आयलानी ही गाडी घेऊन कॅम्प नंबर 3 भागात असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या मागील बाजूस आंबे स्पोर्ट क्लब जवळ उभा होता. धीरज यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्यावेळी गाडीच्या मागच्या बाजूने एक तरूण पायी चालत आला आणि त्याने रस्त्यावरचा एक दगड उचलून या गाडीवर फेकला. त्यामुळे या गाडीचे समोरची काच फुटली.
— News18Lokmat (@News18lokmat) May 30, 2021
VIDEO: घरगुती वादातून शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला, भांडणात भाजप आमदाराची एन्ट्री
गाडीवर दगड फेकल्यानंतर हा तरुण त्या ठिकाणाहून पसार झाला. यात धीरज आयलानी हे थोडक्यात बचावले आहेत. मात्र गाडीचे नुकसान झालं आहे. अचानकपणे झालेल्या हा हल्ल्या आमदार आयलानी यांच्या मुलाला कळलाच नाही. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित ठिकाणीची पाहणी करीत अज्ञााता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला कोणी केला त्याचा उद्देश काय होता याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहे. दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा करायला सुरुवात केली असून लवकर या तरुणाचा शोध घेतला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आमदारांना चप्पल मारण्याचा दिला होता इशारा
या आधी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या उल्हासनगर माजी प्रवक्ता ज्याला भाजपा पक्षातून काढण्यात आलेले आहे असे राम वाधवा यांनी आमदार आयलानी याांना एक इशाराच दिला होता. आमदार आयलानी यांनी मतदार संघात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत तर त्याच्या आमदारकीचा कालावधी संपेपर्यंत दररोज एक व्यक्ती त्यांना चप्पल मारेल अशा प्रकारचा इशारा दिला होता. या इशारा संबंधी आमदारांनीही उल्हासनगर मधील आपल्याा पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन यासंदर्भात पत्र देत कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांना केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Cctv footage, Crime, Ulhasnagar