लखनऊ, 30 मे : उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील एका तरुणाला सोशल मीडियावर हातात पिस्तुल घेतलेला फोटो टाकणं महागात पडलं आहे. इतकच नाही तर या पठ्ठ्याने फोनोसोबत कॅप्शनही टाकली आहे..डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है...त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे.
हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी तरुणाची पिस्तुलही ताब्यात घेतली आहे. मात्र पोलिसांनी जेव्हा पिस्तुलाचा तपास केला तेव्हा ती खेळण्यातील पिस्तुल असल्याचं समोर आलं.
ही घटना हापुड जिल्ह्यातील धौलाना गावातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, सोशल मीडियावर तरुणाचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यात त्याच्या एका हातात पिस्तुल होती. डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है...असं त्या फोटोवर लिहिलं होतं. फोटो व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई सुरू केली.
हे ही वाचा-कोरोनामुळे तडजोड; पैशांसाठी अविवाहित तरुणीसमोर भाडोत्री मातृत्वाचा पर्याय
धौलाना पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं की, तरुणाचं नाव खालिद असं आहे. त्यांनी तरुणांना आवाहन केलं आहे की, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी नियम आणि कायद्याचं उल्लंघन करू नका.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.