Home /News /crime /

पहिलं लग्न 2003 मध्ये, मग 2013, 2016 आणि शेवटी 2021; नागपूरातील लुटारू नवरीचा प्रताप पाहून पोलिसही हादरले!

पहिलं लग्न 2003 मध्ये, मग 2013, 2016 आणि शेवटी 2021; नागपूरातील लुटारू नवरीचा प्रताप पाहून पोलिसही हादरले!

चौथ्या नवऱ्याची तर भयंकर अवस्था करून ठेवली या लुटारू नवरीने...

  नागपूर, 4 मे : नागपुरमध्ये (Nagpur News) 'लुटारू नवरी'चं प्रकरण समोर आलं आहे. मेघाली नावाची ही महिला आपल्या प्रियकरासोबत मिळून लोकांना टार्गेट करीत होती. प्रेम जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून लग्न करीत होती, आणि नंतर लाखोंची वसुली करून घटस्फोट घेत होती. मेघाली आपला प्रियकर मयूर राजूसोबत मिळून हे काम करीत होती. शेवटी हुडको कॉलनीत राहणारा महेंद्र रमेशलाल वनवानीने तक्रार केली त्यानंतर नवरीच्या कृत्याचा खुलासा झाला. केसचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की, मेघाली वर्धा जिल्ह्यातील राहणारी आहे. मात्र आता नागपूरात शिफ्ट झाली. तिने 2003 मध्ये पहिल्यांदा लग्न केलं होतं. यानंतर 2013, 2016 आणि 2021 मध्ये लग्न केलं होतं. ती लग्न केल्यानंतर पतीवर खोटे आरोप करून पैसे उकळत होती. वनवानीने केस दाखल केल्यानंतर नवरीचा खरा चेहरा समोर आला. याच वेळी कळालं की, यापूर्वी तिचं तीन वेळा लग्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनवानीचं नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये भाजीचं दुकान होतं. ती दुकानात भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने वनवानीच्या संपर्कात आली. यानंतर दोघे भेटू लागले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ती वनवानीच्या घरी आली आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करू लागली. जेव्हा त्याने लग्नास नकार दिला तर मेघालीने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर वनवानीने तिच्यासोबत लग्न केलं. ती सासू-सासऱ्यांसोबत भांडण करीत होती. म्हणून वनवानी भाड्याच्या घरात राहू लागला. हे ही वाचा-पत्नी कॉल गर्ल असल्याचं सांगून सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर; सासूनेही... लग्नाच्या एका महिन्याच्या आत मेघाली पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 27 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. यादरम्यान वनवानीकडून तिने 4 लाख रुपये मागितले. या वर्षी एप्रिल महिन्यात पुन्हा तिने वनवानीविरोधात गुन्हा दाखल केला. यंदा वनवानी दोन आठवड्यांनंतर तुरुंगातन सुटला. यानंतर वनवानीला कळालं की, मेघालीने त्याच्या आधी तिघांसोबत लग्न केलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिने आपले पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी मेघाली आणि तिच्या प्रियकराविरोधात आयपीसी कलम 386, 420, 494, 496 आणि 497 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  तुमच्या शहरातून (नागपूर)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Marriage, Nagpur News

  पुढील बातम्या