जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पत्नी कॉल गर्ल असल्याचं सांगून पतीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर; सासूनेही केली मदत

पत्नी कॉल गर्ल असल्याचं सांगून पतीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर; सासूनेही केली मदत

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

Nagaur Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan News) पती-पत्नीच्या नात्याला लाज आणणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीचेच आक्षेपाह्र फोटो आणि व्हिडीओ शूट करू सोशल मीडियावर पोस्ट केली. याशिवाय पत्नीला कॉल गर्ल असल्याचं सांगून तिचा मोबाइल नंबरदेखील पोस्ट केला. ही पोस्ट व्हायरल होताच पत्नीला अज्ञातांचे कॉल येऊ लागले. यानंतर पत्नीला पतीचं धक्कादायक कृत्य कळालं. यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यावेळी तिने पती आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली. हुंड्यासाठी छळ होत असल्याचाही आरोप… विवाहित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सांगितलं की, पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि घराबाहेर काढलं होतं. या प्रकरणात तिने आधीही तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण अद्यापही न्यायालयात विचारधीन आहे. यामुळे रागावलेल्या पतीने पत्नीला बदनाम करण्यासाठी 4 आणि 6 एप्रिल रोजी यूट्यूब चॅनलवर बनावटी आयडीमधून फोटोत फेरबदल करीत फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केले. व्हिडीओमध्ये पीडितेसाठी कॉल गर्ल सारख्या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय खाली मोबाइल नंबरदेखील लिहिला आहे. हे ही वाचा- बलात्काराचा आरोप असणाऱ्या विजय बाबूवर AMMA चा राजीनामा देण्याची वेळ, म्हणाला- निर्दोष सिद्ध होईपर्यंत… कट-कारस्थानात सासूचाही समावेश… पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीच्या या कृत्यामुळे तिला अज्ञातांकडून वाईट फोन कॉल येत आहेत. लोक फोनवर घाणेरडं बोलत आहेत. यामुळे तिला खूप त्रास झाला. पीडितेचा आरोप आहे की, पतीने माझी बदनामी करण्यासाठी हे कृत्य केलं. या कटात सासूचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी पीडितेने केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात