नाशिक, 02 मार्च: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या आत्महत्येमुळे (Nasik Youth Suicide) नाशिकमधील भीमवाडी परिसरात प्रचंड तणाव आहे. या तरुणाने कुण्या गुंडांच्या किंवा इतर कुणाच्या त्रासामुळे आत्महत्या केली नसून पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.
सोमवारी रात्री योगेश हिवाळे या तरुणाने आत्महत्या केली. योगेश गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तरुण आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यात त्याने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी याठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव आहे. याशिवाय स्थानिकांनी योगेशला न्याय मिळावा याकरता ठिय्या आंदोलन केल्याने केले आहे. तसंच त्याच्या नातलगांनी योगेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे.
(हे वाचा-हसऱ्या आयशाच्या आत्महत्येमुळे सारा देश हादरला, पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या)
भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भीमवाडी याठिकाणी हा प्रकार घडला. साधारण रात्री उशीरा 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. योगेशच्या कुटुंबीयांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी या घटनेचा तपास नाशिक शहराच्या क्राइम ब्रँचकडे वर्ग केला आहे. क्राइम ब्रँचकडून नातेवाईंकांची चौकशी केली जात आहे. त्यांचे जबाब नोंदविले जात आहेत. पोलिसांकडून याठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास क्राइम ब्रँचकडून केला जाणार आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली की हा तपास निपक्षपाती व्हावा याकरता क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान योगेशचे नातेवाईक, मित्र परिवार आणि कुटुंबीय यांच्याकडून न्यायाची मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Nashik suicide