मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हसऱ्या आयशाच्या आत्महत्येमुळे सारा देश हादरला, पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या

हसऱ्या आयशाच्या आत्महत्येमुळे सारा देश हादरला, पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या

Ahmedabad Suicide: आयशाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनाबाबत भाष्य केलं होतं.

Ahmedabad Suicide: आयशाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनाबाबत भाष्य केलं होतं.

Ahmedabad Suicide: आयशाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनाबाबत भाष्य केलं होतं.

    अहमदाबाद, 02 मार्च: अहमदाबाद (Ahmedabad) मध्ये साबरमती नदीत उडी देत जीव देणाऱ्या आयशाच्या शेवटच्या व्हिडीओमुळे संपूर्ण देश हादरला होता. 25 फेब्रुवारी रोजी 23 वर्षीय आयशा बानू मकरानीने (Ayesha Banu Makrani) हे टोकाचे पाऊल उचलले. गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) राजस्थामधील पाली या ठिकाणाहून तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. तिचा नवरा आरिफ आयशाच्या आत्महत्येपासून फरार होता, सोमवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आयशाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात तिने असे पतीने केलेल्या शोषणाबाबत भाष्य केले होते. तिचा निकाह 2018 मध्ये आरिफशी झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरिफविरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या दोन दिवसात आयशाचा हा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून केवळ गुजरातच नाही पण संपूर्ण देश तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागील दु:खामुळे हादरलं आहे. सोशल मीडियावर आयशाला न्याय मिळावा याकरता मागणी जोर धरू लागली आहे. अशावेळी तिच्या पतीला झालेली अटक एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. (हे वाचा-चेंडू समजून उचलला बाँब, मैदानात खेळताना एका चिमुरड्याचा मृत्यू तर दोन जखमी) मीडिया अहवालांनुसार, साबरमती रिव्हर फ्रंट वेस्ट पोलिसांचे निरीक्षक व्हीएम देसाई यांनी अशी माहिती दिली आहे की, पाली येथून आरिफ खानला अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांची एक पथक जालोरमधील त्याच्या घरात गेले होते, पण तो तिथे सापडला नाही. यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीला पाली येथून पकडण्यात आले. त्याला मंगळवारी ट्रान्झिट रिमांड अंतर्गत अहमदाबाद येथे आणले जाईल. (हे वाचा-हाथरस: मुलीला छेडणाऱ्यांविरोधात तक्रार केल्यामुळे बापाला गमवावा लागला जीव) जालोरचे पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी अशी माहिती दिली आहे की, की ही संपूर्ण कारवाई गुजरात पोलिसांची होती. जालोर पोलिसांनी यामध्ये त्यांचे सहकार्य केले. आयशा अहमदाबादच्या रिलिफ रोडवर असलेल्या एसव्ही कॉमर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्रामधून एमए करत होती. तसेच एका खासगी कंपनीत नोकरी करायची. 6 जुलै 2018 रोजी तिचे आरिफसोबत लग्न झाले होते. यानंतर 10 मार्च 2020 पासून आरिफ शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने आयशा तिच्या माहेरी आली होती. एवढं होऊनही आयशाने तिच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये अस म्हणाली होती की, तिचं आरिफवर प्रेम आहे. तिच्या वडिलांनी त्याच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याचीही विनंतीही तिने केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Ahmedabad, Gujrat, Sucide

    पुढील बातम्या